पान:कविता गजाआडच्या.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवा गणराज

कुणी सांगितलं तुला
की
देव्हाऱ्यातला चंदनी गणपती
मी विकलाय म्हणून ?
अष्टभोगांनी तृप्तावलेले
ते भाद्रपदी दिवस
आणि
जळत्या कापरासारखी
घरभर दरवळणारी तू
....
आई ग Ѕ
मीही
तुझ्या गणराया शेजारी मांडलाय
नवा गणराज.
गणराज,
मातीच्या माणसांना
जागवीत जाणारा
गणांचा पती
आणि
त्याच्या समोर उभी आहे
मी
जळत्या कापरागत
उजळत जाणारी...

कविता गजाआडच्या /६६