या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सये उजेडाची रेघ
माये आभाळाचा रंग
आज भोर निळा...निळा
आजवेरी डोळा माझ्या
कृष्ण भारला सावळा...
भिजलेले निळे ऊन
गाभ्यातून गह्यरले
माझ्या डोळियात नवे
कोनी सपन पेरिले ?
माये राधियेचे डोळे
त्यात गुलबासी कावा
माये आभाळी भरारे
कंठ फुटलेला रावा...
माये माझिया दाराची
कडी कोनी उकलली..
सये उजेडाची रेघ
घुसळून आत आली..
●
कविता गजाआडच्या /३६