Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मादाम चँग-कै-शेक
१९
 


 चँग-कै-शेक हा सन्यत्सेनचा उजवा हात होता; आणि पुढें तर जपानी साम्राज्यवाद्यांना स्वदेशांतून पिटाळून देण्याच्या कामी यानें जिवाचे रान करून घेतलें होतें, सन्यत्सेन आणि त्याचें सरकार चीन देशाच्या दक्षिणेकडे येऊन बसलें होतें. शांघाय येथें डॉ. सन्यत्सेन आला असतांना त्याच्याबरोबर चँग-कै-शेकही आला होता. सूंगच्या घरीच या तिघांची गांठ पडली.
 चँग-कै-शेक व मेलिंग यांची दृष्टादृष्ट झाली; आणि पुढें कांहीं वर्षांनीं घडलेल्या त्यांच्या विवाहाचें प्रीतिबीज याच वेळीं त्यांच्या मनांत रुजलें. चँग-कै-शेक याचें लग्न त्याच्या आईनें लहानपणींच करून दिलें होतें. पण या बायकोशीं त्यानें काडीमोड करून टाकली; आणि कांहीं वर्षेपर्यंत तो सडाच राहिला. लोक एकमेकांत असेंही कुजबुजत कीं, कॅन्टन शहरी दोन बायांना यानें आपल्या नादी लावले; पण त्यांच्याशी यानें लग्न मात्र केलें नाहीं. पण ही बाब सोडली, तर देशसेवा, समरचातुर्य, पुढाऱ्यावरची निष्ठा आणि साहसवृत्ति या त्याच्या गुणांचा जयघोष सर्व चीनभर चालू होता.
 मेलिंगच्या आईला ही गोष्ट बिलकुल पसंत पडेना कीं, आपल्या मुलीनें असल्या काडीमोड केलेल्या आणि ख्रिस्ती नसलेल्या माणसाशी लग्न करावें. बरें, मेलिंग ही आईचें मत बाजूला सारून लग्नाला सिद्ध होईल असे म्हणावें, तर तेंहि होईना. पांच वर्षेपर्यंत चँग हा मेलिंगच्या आईच्या विनवण्या करीत होता कीं, 'कसेही करा आणि लग्नाला परवानगी द्या.' पण ती म्हातारी परवानगी तर देईचना, उलट चँगशी दोन शब्द बोलण्याचें सुद्धां ती नाकारूं लागली. एकदां ही बाई जपानला गेली असतांना, चँग तिकडे गेला; आणि त्याने तिची आर्जवें केली. तिला वाटे कीं, कदाचित् याची पहिली बायको अजूनही याच्याकडे येईल, शिवाय हा खिस्ती धर्माचा द्वेष करतो. चँगनें नाना प्रकारचे पुरावे देऊन तिला पटवलें कीं, काडीमोड खरोखरच झालेली आहे; आणि तुमचें म्हणणेंच असेल, तर तुमची बायबलची पोथी मी थोडी थोडी वाचीत जाईन. शेवटीं वृद्धेला करुणा आली; आणि १९२६ त सेनापति चँग-कै-शेक आणि मेलिंग यांचे लग्न झालें.
 नवऱ्याच्या हातीं साऱ्या चीन देशाचे भवितव्य आहे, ही गोष्ट मेलिंगला पुरी- पुरी पटलेली होती. तिच्या स्वतःच्याहि प्रवृत्तींत साहसवृत्तीचे अणुरेणू मुळापासूनच जोराजोरानें खेळत असत. हीं दोन साहसीं माणसें एकत्र झाली. कसल्याही प्रसंगांत आपल्या संगतींत धिमेपणाने उभी ठाकणारी स्त्री आपल्याला