पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युधिमिराकडून, कवचकुंडलधारी नाजुक छोटया पावलांचा कर्ण 'सूतपुत्र' असल्याचे कुंतीला अगदी सहज कळते. ती कमालीची अस्वस्थ होते. कुंतीची अशीच शोचनीय अवस्था कृपाचार्य जेव्हा 'क्षत्रियांचे थोरपण खड्गाच्या तीक्ष्ण धारेवर, बाणांच्या प्रखर टोकावर अवलंबून असते' असे कणखरपणे सांगणाऱ्या कर्णाचा रंगागारातील संघर्षाच्या वेळी अपमान करतात तेव्हाही होते. कणखर कर्ण :- महान गुण आणि महान दोष असलेला कर्ण महाभारतकथेला समतोल प्राप्त करून देतो, पांडवांकडे कृष्ण तर कौरवांकडे कर्ण असे हे समतोलन आहे. 'कर्ण दुर्योधन पक्षास मिळाल्यामुळे दोन्ही पक्ष आता तुल्यबळ झाले आहेत.' हे 'कर्णायन' मधील दांडेकरांचे एक महत्त्वाचे प्रतिपादन आहे. याचाच पाठपुरावा पुढील मराठी साहित्यिकांनीही केलेला दिसतो. कर्णाचे धारदार व्यक्तित्त्व मोठ्या उत्कटतेने व प्रभावीपणे दांडेकर चित्रित करतात. कर्ण 'जयाची इच्छा करणे हा प्रत्येक क्षत्रियाचा धर्मच आहे' (पृ. ८४) असे मानतो. द्रोणाचार्य कर्णाला ब्रम्हास्त्रविद्या शिकविण्याचे नाकारतात. तेव्हा कर्ण उसळून म्हणतो 'मी या जन्मीच मिळवीन.' यावर द्रोणाचार्य म्हणतात 'त्यासाठी तुला खोटे बोलण्याचे पाप करावे लागेल' तेव्हा कर्ण तडफदार उत्तर देतो, 'पापाच्या भयापेक्षा मला माझ्या शब्दांचे मोल अधिक वाटते.' मी दुर्योधनाला शब्द दिला आहे. (पृ. ८५) येथे कर्णाची वचननिष्ठा दिसून येते. कमनशिबी कर्णाच्या हातून अनवधानाने गोहत्या घडते. हा प्रसंग वाजवीपेक्षा जास्त विस्ताराने दांडेकरांनी वर्णन केला आहे. 'गाईच्या वधासारखाच तुझा वध होईल.' असा एक वेगळा शाप त्यांच्या या कथेतील ब्राम्हण देतो. एक साधा शाप पण तोही जणू कर्णाची निष्पापता येथे सुचवून जातो. कर्णवधाची तुलना गाईच्या वाशी करण्यात हेच औचित्य प्रगट झाले आहे. महाभारतकथा आधाराला घेऊन असे सूक्ष्म तपशिलातील बदल त्याच कथेला वेगळे कलात्मक रूप देऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. तसेच परशुराम ' भ्रमर- कीटका'च्या स्पर्शानि जागा होतो. तेव्हा तो 'तू विजयी होणार नाहीस.' असा अनोखा शाप देतो. महाभारतात 'तू ब्रम्हास्त्र विद्या विसरशील' असा शाप आहे. गो. नी. दांडेकरांच्या या शापात सगळे भाकीत व्यक्त झाले आहे. या प्रसंगी गो. नी. दांडेकरांनी केलेल्या नवनिर्मितीचा प्रत्यय येतो. परशुराम निद्रिस्त असताना कर्णाची सदसद्विवेकबुद्धी जागी होते आणि सत्य परशुरामाला सांगून टाकावे असे त्याच्या मनात येते. या कलात्मक प्रसंगनिर्मितीने वाचकांसमोर या घटनेतील सत्य प्रकट होते. त्याला लगेच जे भीषण स्वरूप येते ते विशेष जाणवते. 'कर्णकथा' एक पुराणकथा ( माध्यम अथवा साचा ज्याला म्हणता येईल ) असून त्यातील तपशिलाचा भाग १४ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा