पान:करुणादेवी.djvu/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परत आले. “ करुणादेवीचा हा सारा महिमा. तिच्या तपश्वर्येचे हे फळ !” ते म्हणत होते. प्रेमानंद मुकाट्याने घरी गेला.

 तिघे राजधानीत आली. पुन्हा प्रधानपदाचा कारभार सुरू झाला. दिवस आनंदात जात होते.आणि पुढे हेमा व करुणा दोघींना मुलगे झाले. जणू चंद्रसूर्यच पृथ्वीवर आले! राजधानीत शर्करा वाटल्या गेल्या. महोत्सव झाला. आदित्यनारायण ह्यांनी नातू पाहिला. त्यांना धन्य वाटले.

 बरेच दिवस संसार करून तो तिघे मरण पावली, देवाकडे गेली. किती तरी दिवस त्याच्या कथा लोक सांगत असत आणि करुणेचा महिमा तर त्या प्रांतात अद्याप सांगतात. ते मुक्तापूर आज नाही. ते अंबर गाव आज नाही. त्या समाध्या आज नाहीत. तो उंच स्तंभ आज तेथे नाही. तरीही करुणादेवीची गाणी त्या प्रांतात अजून म्हटली जातात. भिकारी म्हणतात. बायामाणसे ऐकतात. मुले मुली ऐकतात.

 “ आई, खरेच का ग अशी करुणादेवी झाली ?”

 मुले मग विचारतात.

 “ तर का खोटे आहे गाणे ? खरेच ही अशी करुणादेवी झाली. तिला मनात प्रणाम करा हो !” असे आई सांगते.

स मा प्त
समारोप * ७५