हे पान प्रमाणित केलेले आहे.
शेवटी अपूर्ण आहोत, परंतु जितके निर्दोष होता येईल तितके होण्यासाठी प्रयत्न करावयाचे. ”
इतक्यात एका बगळ्याने झडप घालून एक मासा पकडला. यशोधराचे लक्ष तिकडे गेले.
“ पाहिलात ना तो प्रकार ?” तो म्हणाला.
“होय महाराज, ” आदित्यनारायण म्हणाले. “ माझे अधिकारी असे नसोत. दिसायला गीरेगोमटे ; वरून गोड गोड बोलणारे; परंतु मनात घाणेरडे. खरे नाणे पाहिजे. अस्सल हवे. नक्कल नको. खरे ना ?”
“ होय महाराज !” सोमेश्वराच्या मंदिरात घंटा वाजत होत्या. सायंकाळ जवळ आली. नाव माघारी वळली. यशोधर उतरला. शेकडो लोकांचे जयजयकार ऐकत व प्रणाम घेत तो राजवाड्यात गेला. असा राजा असावा असे म्हणत लोक घरी गेले.
८ करुणा देवी