पान:करुणादेवी.djvu/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दुः खी
क रु णा

♣ * * * * * * ♣
 शिरीष गेल्यापासून करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे. ती घरचे सारे काम करी. सासूसासऱ्यांची सेवा करी. रात्री अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे.

 करुणा एकटी मळ्यात काम करी. परंतु तिच्याने कितीसे काम होणार ? पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजूरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी नांगर ना बैल. कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा ! कसे तरी करून करुणा गाडा हाकीत होती.

 परंतु हळूहळू कर्ज झाले. मळा गहाण पडला. शेवटी तो सावकाराच्या घशात गेला. आता कोठली बाग, कोठली फुले ? करुणा आता दुस-याकडे मोलमजूरी करी. कोणाच्या शेतात खपे. कोणाच्या घरी दळणकांडण, कोणाची धुणी करी आणि सासूसासऱ्यांचे पोषण करी. करुणेच्या जवळ आता काही नव्हते. सोन्याचांदीचा दागदागिना नव्हता. अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता. तिच्या नेसूच्या चिध्या असत. गरीब बिचारी ! परंतु स्वतःचे दु:ख उगाळीत बसायला तिला वेळ नसे. तिच्यावर जबाबदारी होती. पतीने सूर्यनारायणाची साक्ष घ्यायला लाविली होती. सासूसासऱ्यांचे पालन तिला करायचे होते. ती दिवसभर राब राब राबे. कधी रानात जाई व मोळी घेऊन येई. कधी रानात जाई. व करवंदे विकायला आणी. किंती कष्ट करी !

 परंतु कष्टाचे चीज होत नव्हते. सासूसासरे तिच्यावर रागावत. हीच पांढऱ्या पायांची अवदसा आहे, असे ती म्हणत. एके दिवशी नित्याप्रमाणे,

३४ * करुणा देवी