Jump to content

पान:करुणादेवी.djvu/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 “ राजाचे दूत आहेत. प्रांताधिपतीकडून आले आहैत. हे पाहा आदेशपत्र. ”

 सुखदेवाने ते आदेशपत्र वाचले. शिरीषची मागणी करण्यात आली होती. राजाच्या कानावर शिरीषचे नाव गेले होते. प्रांताधिपतीने शिरीषला पाठवले नाही, म्हणूनं राजा यशोधर रागावला होता. प्रांताधिपतीने ताबडतोब शिरीषला आणण्यासाठी घोडेस्वार पाठविले होते.

 “ चला निघा !” आलेला नायक म्हणाला.

  “ एकुलता एक मुलगा नेऊ नका.” पिता म्हणाला.

 “ आम्ही पिकली पाने झाली. नका नेऊ म्हाताच्यांची काठी !” सावित्रीआई म्हणाली.

 “ त्यांना न्याल तर मी कोठे जाऊ!” करुणा म्हणाली.

 “ तुम्ही सारी रडता का ? तुमचे दैव थोर आहे. ह्या शिरीषला राजा प्रधान करील. वेडी दिसता तुम्ही !” तो नायक हसून म्हणाला.

 “ आजची रात्र तरी नका नेऊ. आज शिरीषच्या विवाहाचा वाढदिवस साजरा होत आहे. आजची रात्र तरी आनंदात जाऊ दे. उद्या न्या. म्हाताऱ्याचे ऐका.” सुखदेव रडत म्हणाला.

 “ बरे, सकाळी नेऊ. सकाळी मात्र आढेवेढे चालणार नाहीत. बऱ्याबोलाने शिरीष येणार नसेल, तर मुसक्या बांधून त्याला न्यावे लागेल. तुम्ही त्याचे नाव लपवून ठेवलेत. प्रांताधिपती चिडला आहे. आता तरी तुम्ही मूर्खपणा करू नका.”

 असे म्हणून तो नायक घोडेस्वारांसह निघून गेला. समारंभ संपला. आईबापांसह व पत्नीसह शिरीष घरी आला. चौघे खिन्न होऊन बसली.

 “ बाळ, नको रे तू जाऊस. काय व्हायचे असेल ते होईल !” आई

 “ अग, असे करून कसे चालेल ? त्याला बांधून ते नेणारच. आणि शिवाय असे बघ, नाहीतरी आपण म्हातारीच झाली. बाळाचे दैव उदयास येत आहे. आपण कशाला आड यावे ? जाऊ दे त्याला राजधानीला. होऊ दे प्रधान. शेतात कष्ट करायला नकोत. राजवाड्यात राहील. हत्तीवर बसेल. जाऊ दे त्याला. आपण मायाममतेने आंधळी होऊन त्याच्या

शिरीष * १५