पान:करुणादेवी.djvu/१२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भविष्याचे का वाटोळे करावे? मनुष्याने दूरचे पहावे. जा हो शिरीष. आम्ही आमचे दुःख गिळू. तू मोठा हो. तुझी कीर्ती दिगंतरात जाऊ दे."

 "बाबा मला कीर्ती नको, वैभव नको. शेतात काम करण्याचा मला कंटाळा नाही. मी शेतात काम करीत असतो, त्या वेळेस सूर्य आशिर्वाद देतो. वारे वारा घालतात. पक्षी गाणी गातात. तहान लागली तर नद्या पाणी देतात आणि भूमाता प्रसन्नपणे हसते. मला शेतात काम करायला खरेच आवडते. नको ते मंत्रिपद, नकोत ते राजवाडे."

 "बाळ परंतु हट्ट चालणार नाही. ते तुझ्या मुसक्या बांधुन नेतील."

 "तसे कराल तर मी प्राण देईन."

 "नको असे नको करूस. कोठेही अस, परंतु सुखरूप अस. माझे तुम्ही ऐका. शिरीषला जाऊ दे."

 "जा हो, बाळ," माता म्हणाली.

 "करुणे, जाऊ का?" शिरीषने विचारले, परंतु करुणा एकदम हुंदका देऊन निघून गेली.

करुणादेवी.djvu१६ * करुणा देवी