पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नजर खाली फिरवली. माझ्या डोळ्यांत वाचण्यासारखं काही असलं तर ते त्यानं वाचू नये म्हणून. मी फक्त पळून जात होते. कुठं आणि कसं थांबायचं हे त्याच्यावर अवलंबून असेलही कदाचित. पण आतापुरता तरी मला आशा करायचा किंवा त्याला करू द्यायचा हक्क नव्हता, कारण माझा निर्णय त्याच्या गरजेसाठी घेतला गेला नव्हता.

स्त्री मार्च १९७७

कमळाची पानं । ५५