पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ४ था. १४५ आज आह्मीं खेळत असतांना, ही एक डोंगरांतील दरी आहे असे समजून अघामुर नांवाच्या अजगराच्या पोटांत गेलों होतों, परंतु कृष्णानें त्या राक्षसाचा नाश करून आह्मांला वांचविलें; नाहींतर आज आह्नीं सर्वजण मेलों असतों. नंतर तेथे एक चार तोंडांचा ब्राह्मण आला व तो आह्मां सर्वांनां व गायींनां आपल्या गांवाला घेऊन गेला. त्या गांवचे सर्वच लोक अमृत पिऊन राहतात, वगैरे हकीकत ते गोपाळ सांगू लागले. ती हकीकत ऐकून गवळ्यांना आपलीं मुलें वेडीं झालीं आहेत असें वाटू लागलें, परंतु श्रीकृष्णानें तो सर्वांचा गैरसमज लवकरच दूर केला.” अध्याय ४ था. धेनुकासुर वध. , 66 एके दिवशीं श्रीकृष्ण, बलराम व गोपाळ वृंदावनांत जाऊन एका वट- वृक्षाखाली बसले; चालतांना बलरामाचे पाय दुखूं लागले ह्मणून श्रीकृष्ण भगवान् त्याचे पाय स्वतः चेपूं लागला. रामअवताराचे वेळीं भगवंतानें रामाचा अवतार घेतला होता, व शेषानें लक्ष्मणाचा अवतार घेतला होता; त्या अवतारांत लक्ष्म- जानें रामाची फार सेवा शुश्रूषा केली होती; तेव्हां कृष्णअवतार घेतेवेळीं शेष ह्मणाला; देवा ! मी या वेळीं वडील बंधु होईन आणि तूं धाकटा बंधु हो. " भगवान् भक्तांचे भक्तीमुळे बांधलेला असल्यामुळे श्रीकृष्ण धाकटा बंधु झाला व शेष वडील बंधु झाला, व वडील या दृष्टीनें श्रीकृष्ण बलरामाला 'दादा कसे काय झणून मोठेपणा देऊन सल्लामसलत विचारीत असे, पण बलरामाला श्रीकृष्णाची कर्तुमकर्तु शक्ति माहित असल्यामुळे तो बहुतेक कृष्णाच्याच अनुमतीने वागत असे. असो; त्या वृक्षाखालीं कांहीं वेळ सर्व गोपाळांनी विश्रांति घेतल्यावर नव- ळच ताडाच्या वृक्षांचें एक मोठें वन होतें, त्या वनांत सर्वजण गेले. तो ऋतु ताडांना फळें येण्याचा असल्यामुळे त्यावेळी त्या ताडांनां खूप ताडगोळे आले होते. गोपाळांनीं तीं मधूर फळें भराभरा झाडावर चढून यथास्थित काढिलीं व मनसोक्त खाल्लीं. याप्रमाणें श्रीकृष्ण व बलराम, गोपाळांमध्ये खेळण्यांत दंग झाले आहेत असें पाहून तेथे धेनुकासुर या नांवाचा दुष्ट राक्षस बरोबर बैलांचा परिवार घेऊन आला, व गोपाळांनां शिंगानी व लाथांनी मारूं लागला. तो धेनु- कासुराचा दुष्टपणा पाहून बलरामाला फार राग आला व त्यानें त्या धेनुकासुराचे पाय घरिले व त्याचें मस्तक त्याचा प्राण जाईपर्यंत ताडाच्या वृक्षावर हापटून त्याचा नाश केला. इकडे कृष्णानें त्या राक्षसाचा जो बैलाचा परिवार होता, तो गदेनें नाहींसा करून टाकिला. १० 4