पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ३ रा. १४३ मुलांपासून पुष्कळ दूर गेले आहेत असें पाहून ब्रह्मदेव त्या मुलांकडे आला व त्यांनांहि सत्यलोक घेऊन गेला, व आतां पुढे काय होतें तें पहात बसला. इकडे गायी सांपडत नाहीत असे पाहून श्रीकृष्ण मागें परतला व गोपाळ भोजन करीत बसले होते तेथें आला, पण तेथें पाहतो तो कोणीहि गोपाळ नाहीं. तो प्रकार पाहून बलराम फारच विस्मित झाला, परंतु श्रीकृष्णाचे लक्षांत तो सर्व प्रकार येऊन हे कृत्य ब्रह्मदेवाचें आहे असें त्यानें ओळखिलें. तेव्हां कृष्णानें जितक्या गायी व जितकीं वासरें नाहींशीं झालीं होतीं तितकीं सर्व पूर्वीप्रमाणे तयार केली. कांहीं गायी लंगड्या होत्या, कांहीं आंधळ्या, कांहीं एक डोळ्या, कांहीं लांड्या, कांहीं खुज्या, तसेंच काळ्या, पांढऱ्या, पिंवळ्या, भुरक्या वगैरे अनेक प्रकारच्या व अनेक रंगाच्या गायी व वासरें थेट पूर्वीप्रमाणे तयार केलीं. व त्याचप्रमाणे कांहीं काळे, कांहीं सांवळे, कांहीं गोरे, कोणी खुजे, कोणी लंगडे, कांहीं रोडके, कांहीं लट, कांहीं सुरुप, कांहीं कुरुप, याप्रमाणें अनेक गोपाळ पहिल्यासारखेच तयार केले, व त्या सर्वोसह श्रीकृष्ण गोकुळांत परत आला. गायी, वासरें व गोपाळ या सर्वोत आतां श्रीकृष्णाचा अंश असल्यामुळे, गोकुळांत घरोघर श्री- कृष्ण अवतीर्ण झाल्यासारखें झालें. पूर्वी यशोदा व नंद हे दोघेच कृष्णाचें कौतुक करीत होते, परंतु ब्रह्मदेवाच्या या कृतीमुळें आतां सर्वानांच श्रीकृष्णाचें लालन पालन करण्याचा योग आला; परंतु गोकुळांतील त्या अज्ञानी लोकांनां श्री- कृष्णाची ती अघटीत लीला कांहींच माहित नसल्यामुळे आपण इतके भाग्यवान आहोत हे कोणाचेहि लक्षांत आलें नाहीं. तसेंच ती सर्व कृति प्रत्यक्ष श्रीकृष्णाचीच असल्यामुळे त्यांत काडीइतकाही उणेपणा कधी कोणाच्या लक्षांत आला नाही. याप्रमाणें एक संवत्सर गेल्यावर ब्रह्मदेवाला वाटले की आपण केलेल्या प्रकारा- मुळे गोकुळांत मोठा घोटाळा झाला असेल, तेव्हां एकदां पृथ्वीवर जाऊन ती मौज अवलोकन करावी. असा हेतू धरून ब्रह्मदेव गोकुळांत आला, आणि पाहतो तो पूर्वीप्रमाणे सर्व गायी गोपाळ जसेच्या तसे असून त्यांचे व्यवसाय आनं- दानें चालले आहेत. तो प्रकार पाहून ब्रह्मदेव अगदी आश्चर्यचकित झाला, व आपण सृष्टिकर्ते असा जो त्याला अभिमान होता, तो त्याचा अभिमान क्षणाघात पार नाहीसा झाला. त्याला वाटले की, आपण इकडे आल्यावर कदाचित् कृष्णानें सत्यलोकाहून हीं आणलीं असतील म्हणून तो सत्यलोकीं जाऊन पाहूं लागला. तो तेथेंही गायी गोपाळ आहेतच. पुन्हां पृथ्वीवर पाहूं लागला तो पृथ्वीवर तशाच गायी व गोपाळ आहेत, तो प्रकार पाहून ब्रह्मदेवाला आपण सत्यलोकीं आहत किं मृत्युलोकी आहोत, अशी भ्रांति उत्पन्न झाली. मग ब्रह्मदेवाला आपल्या त्या कृतीबद्दल फार अनुताप वाटू लागला व त्यानें प्रभूची क्षमा मागण्याचें मनांत आणिलें. याप्रमाणें तो प्रभूची क्षमा मागण्या- साठीं श्रीकृष्णाजवळ जाऊं लागला, तो त्याला सर्व गोपाळ श्रीकृष्णाप्रमाणे दिस