पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु ११२ [ स्तबक भेटले. त्या मंगलकारक व अत्यंत आनंदकारक दिवशीं श्रावणशुद्ध पंचमी तिथी होती. ज्या वारूळांत विष्णु इतके दिवस राहिले होते, त्या वारूळाला लक्ष्मी असा वर दिला की, या वारूळाची श्रावणशुद्ध पंचमीचे दिवशी जो पूजा करील, नागाची आकृति करून जो त्याची आराधना करील, त्याच्या सर्व आधिव्याधि नाहीशा होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण होतील, व तो सर्व सुखाचा उपभोग घेईल. ४ पुरूरवा राजाला पुत्रप्राप्ति. लक्ष्मीला झालेल्या पुत्राचें मुखावलोकन करण्यासाठी त्यावेळी स्वर्गातून देव आले होते. त्या पुत्राला कामधेनूनें दूध दिले व ब्रह्मदेवानें त्याच्या कंठांत यज्ञोपवीत घातलें. नंतर लक्ष्मी विष्णूला ह्मणाली; " अनंता; या पुत्राला विमा- नांत घाला व वैकुंठी घेऊन चला, " तेव्हां विष्णु हाणाले; याचा जन्म मृत्यु- लोकी झालेला असल्यामुळे याला वैकुंठी घेऊन जातां येणार नाही. " असे म्हणून विष्णूंनी त्याचे नाव एकवीर असें ठेविलें आणि त्या अर्भकाला कम- ळाच्या पानामध्ये गुंडाळून पंपासरोवराचे कांठी ठेवून दिले. विष्णु, लक्ष्मी व सर्व देव असे आपआपल्या विमानांत बसून आपआपल्या स्थानी गेले. इकडे काशीपुरीचा राजा पुरूरवा पुत्र नसल्यामुळे अत्यंत उदासीन झाला होता. त्या राजाला त्याची स्त्री एके दिवशी म्हणाली, स्वामी, मला काल रात्री चांगले स्वप्न पडले असे वाटते. आपण शिकारीसाठी कलिंगवनांत गेले असतां आप- णास पंपासरोवराचे कांठी एक सुंदर पुत्र मिळाला असें मी काल स्वप्नांत पाहेिलें, तर ह्या स्वप्नाची प्रचीति पाहण्यासाठी आपण शिकारीची तयारी करावी. आपल्या स्त्रियेनें सांगितल्याप्रमाणे दुरुरवा राजाने लागलीच तयारी केली, व तो आपल्या स्त्रियेसह पंपासरोवराचे काठी आला. पाहतो तो तेथे खरोखरच एक सर्वोगसुंदर लहान अर्भक आहे. तें अर्भक पाहिल्यावर राजाला अत्यंत आनंद झाला, व त्याला प्रेमाचें भरतें येऊन त्याने त्या मुलाला हृदयापाशी कुरवाळून धरिलें. त्याच्या बाहूकडे पाहिले तो एकवीर असे नांव लिहिलेले दृष्टीस पडलें. तेव्हां राजाने त्या बालकाचें एकवीर असेंच नांव ठेविले व तें बालक राणीच्या स्वाधीन केले. राणीला त्या अवचित पुत्रप्राप्तीमुळे साहजिक कार आनंद झाला, व तिनें प्रेमानें त्या बालकाला आपल्या हृदयापाशी घ भरून त्याचे चुंबन घेतले. नंतर राजा मोठ्या समारंभाने त्या मुलाला घेऊन नगरांत आला. याप्रमाणे वैशंपायन ऋषि जनमेजय राजाला कथा सांगत असतांना जन- मेजय राजा म्हणाला, “ वैशंपायन ऋषि ! या पुरूख्याची कशी झाली व त्याचा पुढें वंशविस्तार कसा झाला है कृपा उत्कंठा पाहून वैशंपायन ग्हणाले; " राजा ! या सर्वोचा पुल भगवान् श्री- करून सां राजाची ती