पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १६ वा. विष्णु अशा रीतीने कलिंगवनांत येऊन राहिल्यावर त्या अरण्याची शोभा एका- एकीं शतपट वाढली. वसंतकाल नसतांही वृक्ष टवटवीत दिसूं लागले, पुष्पांनीं टता डोळू लागल्या, फलभारांनी वृक्ष लीन झाले, वृक्ष मोहरल्यामुळे सर्वत्र परिमळ सुटला, कोकिला मोठ्या प्रेमानें गाऊं लागल्या सरोवरांत राजहंस आनंदानें पोहूं लागले, याप्रमाणे त्या अरण्यानें एकदम नवा रंग धारण केलेला पाहून लक्ष्मीला विष्णु या अरण्यांत आले असें खात्रीनें वाटलें. स्यांचा शोध करीत करीत ती त्या पंपासरोवराचे कांठीं आल्यावर तिच्या दृष्टीस तेथे जवळच एक मोठं वारूळ पडलें तें वारूळ पाहून लक्ष्मीला अत्यंत आनंद झाला. त्या आनंदभनेंती तें वारूळ आपल्या पायाच्या टाफांनी खणूं लागली, तेव्हां सर्व पृथ्वी डळमळू लागली. नंतर वारुळांतून विष्णु सर्पस्वरूपाने बाहेर आले, व ते लक्ष्मीला पाहून अत्यंत प्रसन्न झाले. त्या वेळी अश्विनीस्वरूप लक्ष्मी ऋतुस्नात होती. कामातुराप्रमाणें होत असलेल्या त्या घोडीच्या चेष्टांनी सर्पस्वरूप विष्णूहि कामातुर झाले. तेव्हां विष्णूच्या डोळ्यांतून ऊर्ध्वरेत स्खलन झालें, व तें लक्ष्मीने जिभेने चाटून भक्षण केले. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुद्ध पंचमी तिथी होती; व त्या शुभ दिवशीं लक्ष्मीचा व विष्णूचा संयोग होऊन लक्ष्मीला गर्भ राहिला, म्हणून देवांनां अत्यंत आनंद झाला. देवांनी आकाशांतून उभयतां- पुष्पवृष्टि केली व वाद्यांचा गजर केला. त्या वेळी लक्ष्मी म्हणाली विष्णूंनी गर्भोत्पत्ति केल्यामुळे आजचा दिवस अत्यंत शुभ असा झाला आहे. या तिथील न वारूळाची व सर्पाची भक्तिभावानें तुळशीपत्रानें पूजा करील, नागार्च मूर्ति करून जो पूजा करील, मंगल दीप लावून ज आरती करील, त्याचे सव मनोरथ पूर्ण होऊन त्याला कधीही सर्पचाधर होणार नाही. " लक्ष्मीनें अशाप्रकारे दिलेला आशीर्वाद ऐकून सर्व लोकांना मोठा संतोष झाला. नंतर नऊ महिनेपर्यंत लक्ष्मी व विष्णु तेथें त्या कलिंग- अरण्यांतच राहिले. लक्ष्मीला पूर्ण दिवस झाल्यावर ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्या आनंददायक दिवशी देवांना अत्यंत हर्ष झाला. जि कडेतिकडे मंगल वाद्ये वाजू लागली, आकाशांतून नूतन अभंकावर व विष्णूवर व लक्ष्मीवर पुष्पांची व गुलालाची वृष्टि होऊं लागली. पुष्पांच्या सुवासानें दिशा भरून गेल्या, व गुलालाने आकाश लाल दिसूं लागले. नंतर विष्णु व लक्ष्मी दोघेहि शापमुक्त होऊन पूर्वीप्रमाणे सर्वांगसुंदर झाले, व एक- मेकांच्या मनांतील किलिंमत्र नाहींसें झाल्यामुळे दोघेंहि एकमेकांना कडकडून 46

  • मार्गशीर्ष शुद्ध पंचमीपासून श्रावण शुद्ध च दुर्थीपर्यंत आठ महिने होतात, पण

मूळ ग्रंथांत नऊ महिने आहेत, याकरितां श्रावण शुद्ध पंचमीचे दिवशीं नववा मास लागल्यावर लक्ष्मी प्रसूत झाली, असें धरिलें ह्मणजे दोष येत नाहीं.