पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. प्रिय वाचक वृंदहो ! आपणां हिंदूंचे प्राचीन वाङ्मय फार मोठे आहे; परंतु तें सर्व संस्कृत भाषेत असल्यामुळे त्याचा लाभ निवळ मराठी वाचकांस होऊं शकत नाहीं; अशी परिस्थिति असल्यामुळे लक्षावधि देशबांधव आपल्या प्राचीन इतिहासासंबंधानें अज्ञानावस्थेत राहिल्यासारखे झाले आहेत. ही मराठी वाचकांची अडचण दूर व्हावी आणि त्यांस चारी वेद, अठरा पुराणे, सहा शास्त्रें, तसेंच भारत, भागवत, रामायण, यांच्यांतील कथांचे सार थोडक्यांत पहावयास मिळावें ह्मणून महाराष्ट्रांतील प्रसिद्ध कवि 'श्रीकृष्ण' आणि 'मधुकर' यांनी 'कथाकल्पतरू' या नांवाचा प्राकृत ओंवीबद्ध ग्रंथ तयार करून सर्व मराठी वाचकांवर एक प्रकारचे उपकार केले. हा ग्रंथ कथांचा केवळ कल्पतरु असल्यामुळे ' कथाकल्पतरु ' हे त्याचें नांव अन्वर्धक आहे परंतु हा ग्रंथ फार मोठा असून याची किंमतही त्याप्रमाणानें तशीच जरब ह्मणजे वीस रुपये असल्यानें मध्यम स्थितीतील गृहस्थाश्रमी लोकांस ह्या उपयुक्त ग्रंथाचा संग्रह करणें अशक्य झाले आहे. ही अडचण अंशतः दूर करावी आणि साधारण मराठी वाच कांसही प्राकृत ग्रंथांतील “ वाधावणे, बोभाईले, वोहट " इत्यादि शब्दांचा अर्थ समजणे अशक्य असल्यामुळे, प्राकृत ग्रंथांचेंही रहस्य कळणे अशक्य झाले आहे. ती अडचण दूर व्हावी ह्मणून आह्नीं सुलभ मराठी भाषेत गोष्टीच्या रूपानें हा ग्रंथ तयार करविला आहे, आणि तो संपूर्ण ग्रंथ फक्त पांच रुपयांत देण्याची योजना केली आहे. शिवाय हल्लींच्या परिस्थितीकडे लक्ष दिले असतां पांच रुपयांसारखी रक्कमही एकदम देण्यास पुष्कळ लोकांस जड़ पडण्याचा संभव असल्यामुळे त्या प्रचंड ग्रंथाचे सात भाग करून प्रत्येक भागांत दोन दोन स्तबक घेण्याची व्यवस्था केली आहे, व प्रथम दोन रुपये वर्गणी भरून पहिला भाग घेणारास पुढील सहाही भाग आठ आणे दरानें देण्याची योजना केली आहे. हल्ली हा पहिला भाग तयार झाला आहे, व पुढील भाग दरमहा एक प्रमाणे सहा महिन्यांत सर्व ग्रंथ प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली आहे. सारांश मराठी वाचकांस मुलभ रीतीनें ह्या सर्वमान्य कंधाकल्पतरूचा संग्रह करितां येईल, अशाच प्रकारची केलेली ही व्यवस्था सर्वोस पसंत पडेल अशी आह्मांस उमेद आहे.