पान:कथाली.pdf/४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना


 साहित्य प्रवासास शुभेच्छा - शुभास्ते सन्तु पंथानः ।
 प्राचार्या डॉ. शैला (भाभी) लोहिया या सिद्धहस्त लेखिका आहेत. त्यांनी कविता आणि कथा या वाङ्मय प्रकारात प्राधान्याने साहित्य निर्मिती केली आहे. जमिनीत पेरलेले बियाणे जसे स्वाभाविकपणे, सहजपणे, नैसर्गिकतेने आपले रूपं प्रकट करते तशाच स्वाभाविकपणे त्यांच्या साहित्याची निर्मिती होते.
 शैलाभाभींच्या साहित्याला वास्तवाचा भक्कम आधार असतो. अनेकदा हे वास्तव म्हणजे सामाजिक, कौटुंबिक अत्याचाराने घेतलेले भीषण रूप असते. त्यामुळे या वास्तवाचे यथार्थ चित्रण, कलेचा बाज बिघडू न देता त्यांच्या साहित्यातून व्यक्त होताना दिसतो. बहुतेक कथा स्त्रीवादी साहित्य आहेत,
 प्राचार्या सौ. शैलाभाभींचा प्रस्तुत कथासंग्रह या उपरोक्त सत्याचे ज्वलंत दर्शन घडवितो. बहुतेक कथा उपेक्षित स्त्रियांच्या जीवनातील विदारक व्यथा आहेत. 'मला बी साळंला येऊ द्या की...' या कथेतील मेहतर समाजातील शबरी असो वा 'कुंकवाला आधार मेणाचा' मधली बारकूबाई असो. या कथा स्त्रीजीवनातील असहाय्य, अगतिक, दुःखद जीवनाचे दर्शन घडवितात. 'स्फोट' या कथेत एका साखर कारखान्याच्या अध्यक्षाची क्रूरता शब्दबद्ध झाली आहे. प्रतिष्ठेच्या मुर्ख कल्पनेच्या आहारी गेल्याने तो आपल्या बहिणीचा निघृणपणे खून करतो, पत्नीस मोलकरणीपेक्षाही हीन दर्जाने वागवितो. मारहाण नित्याचाच प्रसंग. स्वत:च्या मुलीचीही हत्या करू पाहतो, सहनशीलतेलाही एक मर्यादा

कथाली / तीन