सारखा (खांडेकरांचा शब्द) ययाती गतिहीन, मूढ, पंगू अशा शारीरिक व मानसिक विकृती असणाऱ्या अनुकंपनीय रुग्णात रूपांतरित झालेला आहे. रौद्र, भव्य, भीषण अशा वस्तूला दयनीय रूप व आकार मिळालेला आहे.
मी स्वतः जडवादी आहे. पण आपल्या परंपरेप्रमाणे ह्या टिपणापुरते मी हे गृहीत धरायला तयार आहे की स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात अजून ययाती आहे. हा ययाती तुम्हा आम्हाला भेटला तर काय म्हणेल? तो म्हणेल गड्यांनो, मी फार प्राचीन पुरुष आहे. ज्या महाभारताला तुम्ही प्राचीन म्हणता, ते सुद्धा मला फार अर्वाचीन आहे. ज्या धर्माला, अर्जुनाला आणि कृष्णाला तुम्ही प्राचीन मानता, त्याच्याही पूर्वी राम होऊन गेला. रामचंद्राचा प्राचीन पूर्वज राजा सगर होता. पांडवाचा पूर्वज दुष्यंत होता. मी त्यांच्याही पूर्वीचा. ज्यावेळी देव व असुरांचा संग्राम चालू होता, अजून देवांचा पूर्ण विजय झालेला नव्हता, त्या अतिप्राचीन काळातील मी राजा. उर्वशीला आपल्या अंतःपुरात जागा देणारा पुरुरवा हा माझा आजा आणि स्वतःच इंद्र होणारा राजा नहुष हा माझा पिता आणि ज्याच्या नावे आमच्या वेळचे जग चालत असे, तो वैवस्वत मनू हा तर आम्हाला अगदी जवळचा. आमच्या आजोबांचा मनू हा आजोबा. इतक्या प्राचीन काळातला मी राजा. तुमच्या जगासमोर असणारे प्रश्न आमच्या जगासमोर नव्हते. तुम्ही ज्याला भोग विरुद्ध संयम म्हणता त्या लढ्यात मी स्वतःच संयमाचा प्रतिनिधी होतो. तुमच्या जीवनाला मार्गदर्शन मिळविण्यासाठी आमच्या कथांची उपयोगिता असेल, तर त्यात मला आनंद आहे. पण जो आदर आणि भीतीचा विषय, तो तुम्ही दयेचा प्रांत करू नका. जो संयमाचा श्रेष्ठ प्रतिनिधी, तो भोगाचा प्रतिनिधी समजू नका. निदान आपल्या जीवनातील कणखरपणा, उदात्तता आणि आनंद तर समजून घ्या. सकल ज्ञानाचे जण भांडारच, ज्याला व्यासाने राजधर्म व मोक्ष धर्माचा प्रवक्ता केले, तो तपस्वी व चारित्र्यवान भीष्म युधिष्ठिराला सांगतो, धर्मराजा सकाळीच उठन ज्या सहा पुण्यवान राजांची नावे मी घेतो, ज्यांच्या स्मरणाने सर्व पापे संपतात, तूही त्या पुण्यवान राजांची नावे नित्य स्मरत जा. ते तुझे पुण्यवान आणि पराक्रमी पूर्वज आहेत. नित्य स्वर्गस्थ असे इंद्राच्या आसनाचे अधिकारी आहेत. माझ्या आधुनिक मित्रांनो, त्या पवित्र सहा राजांची नावे तुम्हाला माहीत आहेत काय ? मी त्यांच्यापैकी एक आहे ! ययाती तुम्ही समजता, तसा नाही.
महाभारतात ययातीची कथाच अगदी निराळया रूपात येते. ह्या कथेनुसार ययाती हा वैदिक काळातला थोर सम्राट व पुण्यवान राजा. कौरव पांडवाची मुख्य कथा सांगण्यापूर्वी जनमेजयाला वैशंपायनांनी काही पूर्वजांच्या कथा सांगितलेल्या आहेत. ह्या कथांमध्ये ययातीची कथा आदि-पर्वात
ओळख
ओळख