देणारी आहे. शमिष्ठेच्या प्रेमसामर्थ्याने ययाती भोगाच्या दरीतून वर खेचला जातो व संयमी होतो ही कथा कच निरर्थक करून टाकतो. कचाला महत्त्व देणारी कथा शमिष्ठेचे प्रेम निरर्थक ठरवते. पण तुम्ही कथा कोणतीही घ्या: ययाती हा कणा नसलेला, सामर्थ्य नसलेला, पंग होतोच. चिखलाच्या गोळ्याला स्वतःची इच्छा नसते. इतरांनीच त्याचा आकार निश्चित करायचा असतो. ययातीची स्थिती अशा चिखलाच्या गोळ्यासारखी झाली आहे. ययातीला कणा द्यायचा असेल तर स्वतःचा उद्धार त्याने स्वतःच करून घेतला पाहिजे. स्वतःच्या जीवनकथेचा नायक ययाती स्वतः असला पाहिजे. जर माणूस स्वतःचा नियंता नसेल, तर मग त्याच्या उद्धारालाही अर्थ नसतो. शिरवाडकरांनी ययातीला कणा देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामळे नव्या अडचणी निर्माण होतात. तिथे शिरवाडकरांना रस्ता सापडलेला नाही.
आधुनिकांसमोर भोग विरुद्ध संयम हा संघर्ष उभा आहे. राजकारणात, समाजकारणात, आर्थिक, नैतिक पातळीवर असा हा सर्वव्यापी संघर्ष आहे. आपापल्या सुखाचा शोध घेण्याचा प्रत्येकाचा हक्क आपण अनिबंध मानणार काय ? ह्या सुखासाठी आवश्यक असणारी मालमत्ता जतन करण्याचा हक्क अनिबंध मानणार काय ? स्वातंत्र्य, मालमत्ता आणि सुख ह्या वादात आपण भूमिका कोणती घेणार ? प्रत्येकाने जास्तीत जास्त सुख मिळवावे, जास्तीत जास्त लोकांनी सुख मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणजे समाज सुखी होतो, हे भांडवलशाहीचे तत्त्वज्ञानच आहे. बॅथेमचा सुखवाद हेच सांगतो. भांडवलशाही देहधारी जीवाला देहाविषयी ममत्त्व असणा-या जीवाला, मुक्त स्वातंत्र्य द्यावे असे सांगते. अध्यात्मवादी ज्या स्वातंत्र्याविषयी बोलतात, ते देहासक्तीतून मुक्त झालेल्या अनासक्त आत्म्याचे स्वातंत्र्य आहे. पण ज्यावेळी अध्यात्मवादी अंतिम ध्येय म्हणून आत्म्याचे स्वातंत्र्य सांगतात व त्या प्रवासासाठी तातडीचा व आजचा कार्यक्रम म्हणून देहासक्त जीवाला स्वातंत्र्य मागू लागतात त्यावेळी काय म्हणावे ? देहासक्त जीवाला अनिर्बध स्वातंत्र्य ही आत्म्याच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक अट आहे. ह्या भूमिकेचे दुसरे रूप मोक्षाकडे जाण्याचा मार्ग भोगातून जातो हे आहे. जडवादातील भोगवादी, अध्यात्मवादातील भोगवादी, असे या कार्यक्रमावर एकत्र येतात. हाच विसाव्या शतकातील राजकारणाचा प्रवाह आहे. स्वातंत्र्य-निर्मितीसाठी, स्वातंत्र्य रक्षणासाठी संघटना, संयम व बंधने लागतात. हा समाजवादाचा आरंभ आहे. ययातीची कथा ह्या संघर्षांच्या चित्रणासाठी वापरताना, जुन्या Myth ला नव्या Myth मध्ये रूपांतरित करताना, बिचारा ययाती कणाहीन झाला आहे. गुहेत कोंडलेल्या वादळासारखा (शिरवाडकरांचा शब्द), उधळलेल्या बलवान अश्वा
२५