दृष्टीने कधी मागे पडले नाहीत. वाचकांचा उदंड लोभ त्यांच्यावर नेहमीच राहिला, पण मराठीत जसा कोल्हटकरांचा उल्लेख टीकाकारांनी आदराने केला तसा खांडेकरांचा क्वचितच केलेला दिसेल. एक सज्जन, चारित्र्यसंपन्न लेखक. नवोदितांना उत्तेजन देणारा, निर्मत्सर साहित्यिक, जीवनातील मूल्य जपणारा व गरज पडेल तर त्या मूल्यांसाठी किंमत मोजणारा एक कादंबरीकार म्हणन सर्वांनी खांडेकरांचे कौतुक केले.
खांडेकर हे जन्मजात शिक्षक. प्रत्यक्ष शाळेतील शिकवणे जरी त्यांनी बंद केले असले तरी शिक्षकाची, त्यांची भूमिका सुटली नाही. समोर येणा-या व्यक्तीस आपल्याला जे जे माहीत असेल ते समजावून सांगण्याचा त्यांचा हुरूप व त्यांची शिकवण्याची हौस परवा परवापर्यंत अम्लान होती. अगदी अलीकडे पाऊणशे वयोमान झाल्यानंतर ते गप्प बसू लागले. त्यांच्या आयुष्यातील किती वेळ नवोदितांनी व जिज्ञासनी खाल्ला, किती वेळ सहज गप्पा मारणान्यांनी खाल्ला याचा अंदाज करता येणार नाही. भाऊ नेहमीच मोकळे, अघळपघळ आणि बोलके होते. तुसडे आणि शिष्ट असे त्यांचे रूप कधीच नव्हते. मित्रांना अडीअडचणीत मदत करणे हे तर दायित्व त्यांनी पार पाडलेच पण आपण लेखक आहो ह्या भूमिकेचा विसर पडू न देता राष्ट्रकारण, राजकारण, समाजकारण ह्या क्षेत्रांतील जवाबदारीसुद्धा ते विसरले नाहीत. त्यामुळे सामाजिक जबाबदारी मान्य करणारे पुरोगामी लेखक म्हणून त्यांच्याविषयी चौरस प्रेम राहिले. निष्ठा पाळणे त्यासाठी स्वाभाविक होते. खरे म्हणजे रा. ज. देशमुख हे त्यांचे प्रकाशक. प्रकाशकाचा लेखकाशी जो संबंध असतो त्याहून निराळा संबध ह्या लेखक-प्रकाशकात येण्याचे काहीच कारण नव्हते. पण आरंभापासूनच केवळ व्यावहारिक संबंधापेक्षा दोघांचा संबंध निराळा राहिला. मानीव पितापुत्राचे परस्परांशी नाते असावे असे हे नाते उभयपक्षी सांभाळले गेले आणि अनेक व्यावसायिक चढ-उतारात गेली ३५-४० वर्षे ते अधिकच दढ होतही गेलेले आहे. खांडेकरांविपयी अशा अनेक बाबी सांगता येतील. म्हणून माणूस खांडेकर हा नेहमी प्रेमादराचा विषय राहिला.
मराठीत कुणालाच खांडेकरांशी वैर करण्याची भीती वाटली नाही. बरोबरीच्या लेखकांनी, वयाने लहान असणान्यांनी, अतिशय मोकळेपणाने त्यांच्याविषयी लिहिले. खांडेकर सूड म्हणन कुणाच्या मागे कधी हात धुवून लागले नाहीत. कुणाचे नुकसान व्हावे ह्यासाठी झटले नाहीत. एकाच्या चुगल्या दुसन्याजवळ करून भांडण लावून देऊन गंमत पाहात बसणे त्यांना माहीत नव्हते. सर्वांनाच हे माहीत आहे. खांडेकरांविषयी बेजबाबदार पद्धतीने लिहिताना सर्वांनी मनात हे गृहीत धरलेच होते की भाऊ हे सगळे क्षमेच्या
ओळख