पान:ओळख (Olakh).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाऊसाहेब खांडेकर आणि त्यां वाचक व्यक्तिश: भाऊसाहेब खांडेकर आता सर्व रागालोमांच्या पलीकडे गेलेले आहेत. प्रकृतीच्या दृष्टीने ते ठणठणीत कधीच नव्हते. नेहमीच त्यांची प्रकृती दुबळी व अशक्त राहिली. तारुण्यही त्यांना दगदग सहन होत नसे. डोळे पूर्वीपासूनच अधू होते शेवटो शेवटी तर तल्लख अशा बुद्धी व संवेदनक्षमतेविना त्यांच्याजवळ काहीच राहिलेले नव्हते. शरीर अधिकच क्षीण झालेले होते. डोळे पूर्ण गेलेले होते. मनाने ते केव्हाच पैलथडी जाऊन बसलेले होते. बोलण्याची, चर्चा करण्याची, त्यांची हौसही संपलेली होती. जुन्या रागालोभांचाही त्यांनी निरोप घेतलेला होता. कोणत्याही पारितोषिकाची इच्छा त्यांना कधीच नव्हती. पण मिळाल्यास आनंद होता. आता त्याच्याही पलीकडे ते गेलेले आहेत. म्हणून त्यांच्या दृष्टीने पारितोषिक मिळणे वा न मिळणे द्या दोन्हीचाही अर्थ उरलेला नव्हता. अर्थ होता तो आपल्यासाठी, कारण त्यामळे मराठी भाषेला एक नवीन अभिमानविपय मिळालेला होता.
  मराठी साहित्याच्या जगात भाऊसाहेब खांडेकर हे नेहमीच आदराचे, प्रेमाचे व कौतुकाचे स्थान राहिले त्याचबरोबर चेष्टा, अवहेलना व तुच्छतेचेही स्थान राहिले. या खरे म्हणजे अगदी परस्परविरोधी अशा दोन धारा आहेत. पण खांडेकरांना एकाच वेळी दोन्ही धारांचा अभिषेक सारखा चाल असे. साहित्य-जीवनाच्या आरंभकाळात खांडेकर कोल्हटकरांचे शिष्य व गडकन्यांचे मित्र झाले. आयुष्यभर या शिष्यत्वाचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. आणि मित्रत्वाचे दायित्व स्वीकारले. वाङमय गुणांच्या दृष्टीने खांडेकर कोल्हटकरांना नेहमीच सरस राहिले. पाहाता पाहाता कोल्हटकर जुने झाले त्यांना फार मोठी लोकप्रियता कधीच मिळालेली नव्हती. खांडेकर हे वाचकांच्या

ओळख