く ऑईल इंजिनची माहिती. ( ፍዒ ) फीलडॉग ऑईल इंजिन, हेंही एक चांगल्यापैकीं इंजिन आहे. हें फोरसायकलच्या तत्वावर बनविलेलें असतं. हें इंजिन साध्या राकेल तलानें चालतें. हें चांगलें भकम असतें. याचा व्हेपोराइझर अगदी साधा असते व तेलाचें ज्वलनही त्यांत चांगलें होतें. या इंजनमध्यें दिवा एकसारखा पेटत ठेवावा लागत नाहीं. व्हेपोराइझरच्या उष्णतेनेंच मिश्रण पेटतें. यासाठी व्हेपोराइझर पुरेसा गरम ठेवण्याकरिता एक्झॉस्ट (जळलेला) वायूचा कांहीं भाग व्हेपोराइझरच्या मधून जातो यामुळे व्हेपोराइझर पुरेसा गरम रहातो. याशिवाय व्हेपोराइझरच्या बाजूला एक नळी बसविलेली असते. तिचा उपयेोग इंजिन चालू करण्याचे वेळेस किंवा इंजिन कांहीं वेळ कांहीं कामासाठीं बंद ठेवावयाचें असेल किंवा अगदीं लाइट लोडवर चालवावयाचें असेल त्या वेळेस होती. अशा वेळी ट्यूबखालीं दिवा पेटवून ठेवावा लागतो. गव्हरनर सेंट्रिफ्यूगल टाईपचा गोळ्यांचा असतेा. हा फार जोरानें फिरत असतो. याचे योगानें लोड जसे असेल त्याप्रमाणें इंजिनमध्यें तेल कमीजास्त जातें. असला गव्हरनर असल्यामुळे इंजिनची गति लोड कसेंही बदललें किंवा बदलत असल तरी फारशी बदलत नाहीं. शिवाय या गव्हरनरमध्यें अशो एक युक्ति केलेली आहे कीं जर इंजिन अगदीच लाइट लोडवर चालत असलें तर व्हालव्ह गिअर चालत नाहीसें होतें. यामुळे घर्षणांत फुकट जाणारी बरीच शास्त वांचून । तेल कमी लागतें. या कंपनीचे मुंबईचे एजंट डंकन स्ट्रॅटन आणि कंपनी हे आहेत.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/83
Appearance