पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५८) ऑईल इंजिनची माहिती. इंजिनची रिपेर व इंजिनची देखरेख यांबद्दल जास्त लिहिण्यास नको. मार्गे दिलेल्या सूचना व इंजिन बरोबर मिळणा-या सूचना या लक्षांत घेतल्या असतां इंजिन नीट आर्डरमध्यें ठेवण्यास अडचण पडणार नाही. - सेमिडीझेल ऑईल इंजिन संबंधी थोडी जास्त माहिती. सेमिडीझेल इंजिनें वीस पासून शंभर ते दोनशें हेंॉर्सपॉवरच्या शक्तीसाठी ‘ असतात. ही सर्व इंजिनें कूड ऑईलनें चालण्याजोगी बनविलेली असतात. आडव्याजातीचीं असली बहुतेक इंजिनें अगदीं एकसारखों असतात स्यात फरक बहुतकरून काय तो व्हेपोराइझरमध्येंच असतो. ह्या त-हेच्या बहुतेक इंजिनवर जाकेट साफ करण्याकरितां एक पडदा असतो. जाकेट साफ करण्याचे वेळेस हा पडदा काढून त्यांतून हात घालून किंवा स्केपरनें (खरवडण्यानें) जाकेट मधील घाण काढ्न टाकितात. ह्या जातीच्या बहुतेक बेअरीगनां चांगलें पुरेसें तेल जावें ह्यणुन बेअरिंगमध्यें शाफटिंगवर रिंगा किंवा चेन (सांखळी) घातलेल्या असतात. या रिंगा किंवा चेन बेअरिंगमध्यें तेलांत बुडालेल्या असतात व शाफ्टींग बरोबर फिरत असतात. । यामुळें तेल शाफटिंगवर एकसारखें येत असतें. बेअरिंगमधील ब्रास गनमेटलचे किंवा अँटिफ्रिकाशन मेटलचे असावे. व्हाईटमेटल घातलेले असू नयेत. कारण व्हाईट मेटल ब्रासमधून पुष्कळ वेळेस गळून पडते. तसेंच जर कदाचित ब्रास गरम झाला तर व्हाईट भेटल इतकी पाघळून जाते व शॉफ्टींगवर इतकी घट्ट चिकटून बसते कीं ती शाफटिंगवरून तोडून काढावी लागतेः यामुळे वेळ फार फुकट जाऊन उगाच नुकसान मात्र होतें. तरी होता होई तों असल्या बेअरिंगचे इंजिन घेऊं नये. द्या त-हेच्या सर्व इंजिनाचे व्हालव्ह ह्मणजे हवेचा °दालव्ह व एक्झास्ट व्हालव्ह हे एकावर एक असतात व दोन्ही एकाच कयामनें चालतात, हे सिलिंडरच्या मागें बोलटानीं बसविलल्या भागांत ज्याला वेंक एन्ड किंवा मागला भाग अर्षे झणतात त्यांत वसविलेले असतात. हे काढावयाचे असल्या पहिल्यानें वरचा हवेचा व्हालव्ह काढून मग त्याच भोंकांतून खालचा एक्झास्ट व्हॉलव्ह काढून घ्यावयाचा असते'; मग प्राइंड करून पुन्हां असेच जाग्यावर वसवितात. हवेच्या व्हालव्ह पेक्षां एक्झास्ट व्हालव्ह मोठा असतो यामुळे त्याची सीटही मोठी असते. ती जळलेल्या वायूनें फार गरम होते; ह्मणून ती थंड करण्यासाठी तिच्या भोंवती जाकेट मधील पाणी जाण्याची व्यवस्था केलेली असते,