या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
ओॉईल इंजिनची माहिती. ( ፬ፂኣ ) इंजिन थांबवावयाचें असेल तेव्हां कंट्रोलिंग व्हालव्ह बंद करावां किंवा गव्हरनरची लिव्हर उचलावी आणि तेल जाण्याचें बंद करावें. ह्मणजे व्हेपमूव्हालव्ह व पंप चालू रहात नाहछंत. पंपवर रिलीफ व्हालव्ह बसविला असल्यास तो उघडावा. दिवा जळत असल्यास विझवावा. इंजिनची क्रांक काम्प्रेशन स्ट्रेकवर आणून अगदी खालीं गेऊन उभी करावी ह्मणजे कोणचाही व्हालव्ह उघडा रहाणार" नाही. पिस्टनचें टॉक लाइनरचे पुढे येऊं नये. पुढें आल्यास त्यावर धुरळा बसतो. इंजिन पुसून स्वच्छ करावें. तेलाच्या कपमध्यें वाती असल्यास काढून ठेवाव्या. साइटफीडचे कप असल्यःस तेल जाण्याचें बंद करावें. इंजिन थोडावेळ बंद करावयाचें असल्यास व्हेपो* राइझरखाली व इझिशन ट्यूबाखालीं दिवा लावून ठेवावा ह्मणजे इजिन ताबडतोब चास्ट्र करता यत.