पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

HTT SEER, -Sesays 2 ऑईल इंजिनची निवड. अलीकडे मजुरी फार वाढल्यामुळे यंत्रानें कामें करून घेण्याची प्रवृत्ती फार वाढत चालली आहे. पुष्कळ लोक असे कारखाने काढतात; पण त्यांनां कोणत्या तंत्र्हेचें इंजिन आपल्या कामाला घ्यावें हें नष्क्री ठरवितां येत नाही, यामुळे त्यांनां फार त्रास होतो. हृाणून ते इंजिनें विकणारे सांगतील तसलें इंजिन सरतेशेवटीं विकत घेतात. पण याबद्दल त्यांची त्यांनांच खात्री येत बसते. केव्हां केव्हां असें होतें कीं अमक्यानें धतलेलें इंजिन चांगलें चालत आहे असें पाछून आपण तसलेंच इंजिन घेतात. पण आपलें घ दुस-याचें काम ही निरनिराळीं आहेत, हें त्यांच्या लक्ष्यांत येत नाही. यासाठीं निरनिराळ्या इंजिनांच्या नमुन्याचें वर्णन दिल्यास फायदेशीर होईल असें वाटल्यावरून त्यांचें घर्णन पुढल्या भागापासून देणार आहें. आतां ही गोष्ट खरी आहे कों ऑईल इंजन हें कांहीं अगदीं नवीन राहिलें नसून बहुतेक सर्व तन्हेचीं इंजिनें कोणत्याही त-हेच्या कामास उपयेगीं पडतील अशी असतात. तरीहीपण कांहीं ठरीव कामाला एका ठरलेल्या कामाचींच इंजिनें जास्त वांगल्या त-हेनें चालतात; यासाठीं या वर्णनाचा फार उपयोग आहे. इंजिन चालविण्यास व तें सुस्थितींत ठेवण्यास लागणारा खर्च यांचा अदमास केल्याशिवाय इंजिन स्वस्त मिळतें येवढ्यावरच इंजिन एकद्भ घेऊं नये. इंजिनला तेल कमी लागलें पाहिजे ही मुख्य गोष्ट खरी, पण इंजिनची रचनाही साधीच असली पाहिजे. तसेंच इंजिन चालविण्यास चांगला माणूस मिळण्या जोगा आहे कीं नाहीं हेंही लक्षांत घेतलें पाहिजे. पुढे दिलेल्या गोष्टींमध्यें निरनिराळ्या इंजिनांमध्यें फरक आहे. १ तेलाचा पुरवठा (ऑईल सछाय ) २ तेलाची वाफ होणें ( व्हेपोराईझर ) ३ तेलाची वाफ व हवा पेटणें-ज्वलन (इमिशन) ४ इंजिनची चाल नियमित राहणें ( गव्हरजिंग) हें सर्व लिहिण्याचें कारण इतकेंच कीं निरनिराळ्या इंजिनांमध्यें ह्या बाबी कशा काय असतात, तें स्पष्टपणें कळावें.