সােতা ভূস্বত্বা, कोणत्याही कारखानदारास किंवा दुकानदारास ऑईल इंजिनची शक्ति विचारल्यास पुढे दिलेल्या तीन नांवापैकीं एका नांवानें सांगतात. पहिलें नामिनल हांसेपावर एन एच पी (N. H. P.) ह्या नांवांत कांहीं अर्थ नाहीं; कारण ती काय प्रमाण धरून मोजलेली असते हें कांहीं सांगतां येत नाही. प्रत्येक कारखानदाराची एन् एच्.पी मोजण्याची त-हा व प्रमाण हें बहुतेक निराळे असतें ह्मणून एन् एच्.पी वर कधींही अवलंबून राहू नये. दुसरें इंडिकेटेड हॉर्सपॉवर, आय् एच्. पी. ( 1. H. P. ) इंजिनला डायग्राम इंडिकेटर ह्मणुन एक यंत्र असतें. तें लाविलें असतां इंजिनची शक्ति दिसून येते. इंजिनमध्यें तेलाची वाफ व हवा यांच्या मिश्र ॥ाच्या स्फोटामुळे उत्पन्न झालेली ही शक्ति होय. पण हिचाही व्यवहारांत कमी उपयोग होतो. करितां हीहीं गि-हा- ईकांच्या उपयोगी नाही. तिसरें ब्रेक हॉर्सपॅॉवर, बी एच्.पी ( B. H. P.) ब्रेक हॉर्सपॉवर इंजिनला ब्रेक लावून काढलेली असते. इंजिनची ब्रेक हॉर्सपॅॉवर हा इंजिन चांगलें चालत असतां जी शक्ति देईल ह्मणजे ज्या शक्तीचें काम करील ती होय. गि-हाईकांच्या ख-या उपयोगाचें नांव हेंच होय. कारण त्यांच्यामुळे इंजिन किती शक्तीचें काम करल तें कळतें व त्यामुळे आपणांस केवढें इंजिन घ्यावयाचें तें ठरवितां येतें. करितां इंजिन घेतांनां त्याची ब्रेक हॉर्सपेॉवर विचारावी. बहुतेक सर्व इंजिन करणारे व विकणारे हछीं इंजिनची ब्रेक हॉर्सपेींवरच सांगतात. जेव्हां कोणाला कांहीं कामासाठीं ऑईल इंजिननें यंत्रं चालवावयाचीं असतील तेव्हां जीं यंत्रं चालवावयाची असतील त्यानां ती चालविण्यास प्रत्येक यंत्राला किती शक्ति लागेल त्याची यंत्रे विकणारा • जवळ चौकशी करावी व त्या सर्वांनां लागणा-या शक्तीची बेरांज करावी. पुष्कळ वेळां असें होतें कीं, कारखान्यांत पुष्कळ निरनिराळीं यंत्रं बसवावी लागतात. तीं सर्व कांहीं एकदम चालत नसतात. कांहीं वेळ एक, कांहीं वेळ दुसरें, अशीं चालत असतात. ह्मणून यंत्रांच्या शक्तीची बेरीज करतेवेळीं जितकीं यंत्रं सारखीं चालवावयाची असतील त्यांच्याच शक्तींची बेरीज करावी. उगाच सगळ्या यंत्रांचीं करू नये,
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/17
Appearance