ऑहेळ इंजिनची माहिती. ( t ) खर्च १४५ रुपये होईल. यावरून वाफेच्या इंजिनपेक्षां आईल इंजिनांत किती फ्झादा आहे हें सहज दिसून येईल. या शिवाय वाफेच्या इंजिनमध्यें असा तोटा आहे कीं बेॉयलरवर फार लक्ष ठेवावें लागतें. त्यांतील पाणी कमी होऊं देतां उपयोम नाहीं किंवा वाफेचा दाब जास्त होऊं देऊनही चालणार नाहीं व कमी होऊनही चालणार नाहीं. कारण वाफेचा दाब (प्रेशर) कमी झाला तर इंजिन सावकास चालूं लागेल व जर पाणी कमी झालें किंवा दाब फार वाढला तर बायलर फुटून मोठा अपघात होण्याची भीति असते. अॅईिल इंजिनमध्यें हा कांहीं त्रास नसतो. त्याला लागणारें तेल त्यांत आपोआप जात असतें व तें दर वेळेस जरुरी पुरतेंच जातें. तसेंच त्याच्याभोंवतीं जाणारें पाणीही एकदां काक खोलला ह्मणजे आपोआप जात असतें. याबइल याजकडे कांहीं ह्मणण्यासारखें लक्ष ठेवावें लागत नाहीं. यदाकदाचित असें झालें ( असें धरून चाललें ) कीं इंजनांत त्यास लागणारें तेल जरूरीपेक्षां जास्त गेलें व त्या भोंवती पाणी कमी गेलें किंवा मुळींच गेलें नाहीं तर फारच झाल्यास इंजिन बंद पडेल, पण फुटतूट किंवा. अपघात वगैरे कांहींच होणार नाहीं. ोंईिल इंजिनशीं तुलना करून बघण्याजोगें दुसरें इंजन ह्मटलें ह्मणजे ग्यासनें ( कोळशाच्या धुरानें) चालणारें इंजिन होय. परंतु ही तुलना जराशी चमत्कारिकच होय. कारण कोलग्यास (कोळशाचा धूर ) हा मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांतच विकत मिळण्यासारखा असतो. बाहेर कोठंही तो मिळणें शक्यच नसतें. अलीकडे प्रोडयूसर(ग्यास उत्पन्न करणारीं यंत्रे) निघाली आहेत, पण त्यांचा प्रसार अजून फारसा झाला नाही. प्रेोड्युसरनें अजून कसल्याही चांगल्या वाईट कोळशापासून ग्यास उत्पन्न करितां येत नाहीं. त्याला अती उत्तम प्रकारचा कोळसा लागतो. प्रोडयूसर आर्ण ग्यास इंजन हीं दोन्हीं बरोबर वापरलीं असतां आईल इंजिनपेक्षां खर्च जरासा कमी येतो हें खरें, पण त्याला पुन्हां मागली पैशाची अडचण येते; कारण प्रेोडणुसर आणि इंजिन या दोघानां मिळून आईल इंजिनच्या दुप्पट किंमत पडते. तसेच तें अजून बरेंच नवीन असल्यामुळे त्यासाठीं माणूसही फार हुषार लागतो व त्याला पगार जास्त द्यावा लागतो. स्याला जागाही बरीच लागते. कूड ऑईलनें (गाळ साळ तेलानें) चालणा-या इंजिनपेक्षां कांहीं त्यास कमी खर्च येत नाहीं. कारण कूड ऑईल फार स्वस्त मिळतें. मोठमोठ्या शहरांतसुद्धां ग्यास इंजिन पासून फारसा फायदा आहे असें नाहीं. कारण एकतर ग्यास स्वस्त मिळाला पाहिजे. झुसरें जर ग्यासच्या मोठ्या नळापासून इंजिन बरेंच लांब असेल तर त्य॥ मोठ्या नळापासून ग्यास इंजिनजवळ नेण्यास पुष्कळ नळ्या जोडाव्या लागतात. या
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/15
Appearance