पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्हावीत. त्यासाठी सर्व पालक, संस्था, सरकार, शिक्षण संघटना यांनी खालील हक्कांचे भान ठेवून त्यांचे विधिवत पालन करणे आवश्यक आहे, असे ‘बालक हक्क' खालील होत -
१. बालक हक्काच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केलेले सर्व हक्क प्रत्येक बालकाला जात, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय वा अन्य मतप्रणाली, राष्ट्रीय वा सामाजिक उगम, मालमत्ता इत्यादींचा विचार न करता मिळायला हवेत.
२. बालकाला विशेष संरक्षण मिळावे, त्याचा शारीरिक, मानसिक, नैसर्गिक, आध्यात्मिक व सामाजिक दृष्टींनी विकास होऊ शकेल अशा संधी- सुविधा त्याला कायद्याने वा अन्य मार्गानी उपलब्ध करावयास हव्यात.
३. जन्मापासून बालकाला नाव व राष्ट्रीयत्व मिळण्याचा हक्क आहे.
४. बालकाला सामाजिक सुरक्षेचे सर्व लाभ मिळायला हवेत.
५. शारीरिक, मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या अपंग असलेल्या बालकाला विशेष प्रकारची वागणूक, शिक्षण देण्यात येऊन त्याची विशेष प्रकारची काळजी घेण्यात यावी.
६. बालकाच्या पूर्ण व सुसंवादी विकासार्थ त्याला प्रेम व सलोखा यांची गरज असते. कोवळ्या वयातील बालकाला, अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता, त्याच्या मातेपासून दूर करू नये. अनाथ व निराधार बालकांची विशेष काळजी वाहणे आणि त्यांना आधार देणे हे समाजाचे आणि शासनाचे कर्तव्य ठरते.
७. बालकाला मोफत व सक्तीचे किमान प्राथमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. बालकांचे सामर्थ्य वाढेल, त्यांच्या निर्णायक बुद्धीचा विकास होऊन त्यांच्या ठायी नैतिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल आणि समाजाला त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचे शिक्षण बालकाला उपलब्ध करावयास हवे.
८. क्रूरता, पिळवणूक व दुर्लक्ष या सर्व प्रकारांपासून बालकाला संरक्षण मिळावयास हवे. त्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यापार करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे त्याच्या जीवितास धोका संभवेल अशा कोणत्याही अनारोग्यकारक व्यवसायात त्याला गुंतवू नये.

९. जातीय, धार्मिक वा अन्य प्रकारचा भेदभाव उत्पन्न करणाच्या प्रवृत्तीपासून

एकविसाव्या शतकातील शिक्षण/५९