पान:उषःकाल.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोध


म्हणे-
कुरूंच्या दरबारी
हजारो डोळ्यांनी

  पाहिला हरी
  वस्त्रे पुरविणारा !

आणि तिथं पासून
आमचे डोळे

  तहानेलेत हरीसाठी

शोवतात हरीला .. ...
पाहतात - ऐकतात
अनुभवतात कित्येक द्रौपद्या
होताना विवस्त्र  एका कृष्णासाठी !

हृदयातला हरी
झोपवून उरी
शोध चालू आहे

दारोदारी  .. !

उष. काल । २३