पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)


 " आमदार सय्यद अमीन यांनी “इस्लाम आणि संस्कृति" हा ग्रन्थ मराठी भाषेत लिहिल्याबद्दल मला आनंद वाटतो. इस्लामचे विविध पैलू त्यांनी उत्कृष्टपणे दाखविले आहेत व आपला दृष्टिकोन मांडतांना मुस्लिम व मुस्लिमेतर विद्वानांचे जागोजाग भरपूर हवाले दिले आहेत. हल्लींच्या ढासळलेल्या आध्यात्मिक व ऐहिक परिस्थितीमधून मानवतेची सुटका करण्याकरितां सर्व जग एका नव्या मार्गाच्या शोधांत आहे. अशा प्रसंगी या ग्रन्थाचा मोठा उपयोग होण्यासारखा आहे. असा ग्रन्थ मराठी वाचकांपुढे ठेवण्याचे श्रेय आमदार सय्यद अमीन यांनी मिळविले आहे. आपल्या देशांत वास्तव्य करणाऱ्या अनेक धर्मियांत समझोता व स्नेहभाव उत्पन्न करण्याचा हा एक स्तुत्य मार्ग होय.

-डॉ. अब्दुल हमीद काझी, एम्.ए., पीएच्.डी.



"ज्यांना धार्मिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती विषयी आस्था वाटते त्यांना “इस्लाम आणि संस्कृति हा ग्रन्थ आवडीने वाचावा असे वाटेल. श्री. सय्यद अमान यांना आपल्या विषयाचे पूर्ण ज्ञान असून, तो विषय सुदर भाषेत हाताळला आहे. हा महत्त्वाचा ग्रन्थ २० चातुर्याने व सुस्पष्ट रीतीने लिहिल्याबद्दल महाराष्ट्राच्या या नामवंत मुस्लिम ग्रन्थकाराची प्रशंसाच केली पाहिजे.”


-शेख अब्दुल अजीझ, एम्.एस्सी. (लंडन)