पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी जाणणाऱ्या विद्वान् मुस्लिमांच्या चष्म्यांतून


 " मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सभासद आमदार सय्यद अमीन यांनी लिहिलेला 'इस्लाम आणि संस्कृति' हा महवाचा ग्रन्थ मोठ्या आवडीने वाचला. धर्म, समाजकारण, राजकारण व तत्त्वज्ञान या इस्लामच्या विविध पैलूंचा वाचनीय इतिहास यामध्ये आहे; इतकेच नव्हे तर त्याचा जगभर प्रसार कसा व कोणत्या परिस्थितीत झाला आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण व सुसंस्कृतता वाढविण्यास त्याची कशी मदत झाली याचे विवेचन आढळून येते. या ग्रन्थांत ग्रन्थकर्त्यांचे गाढ ज्ञान व विद्वत्ता प्रकर्षाने दिसून येते आणि म्हणूनच या ग्रंथाची गणना महान् साहित्यामध्ये होईल असा मला विश्वास वाटतो."

-सय्यद अबदुल्ला, एम्.ए., एलएल् .बी.


(चन्सलर्स गोल्ड मेडलिस्ट, मुंबई युनिव्हर्सिटी)


 " सय्यद अमीन, एम्. एल्. ए., यांनी संशोधन करून इतका विद्वत्ताप्रचुर ग्रन्थ लिहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. विषयाची आकर्षक मांडणी, विद्वत्तापूर्ण विवेचन, उदात्त विचारसरणी, गोड व ओघवती भाषा व डौलदार लेखनशैली ही या ग्रन्थाची वैशिष्टये आहेत. इतका महत्त्वाचा ग्रन्थ लिहून त्यांनी मराठी साहित्याचीच नव्हे तर आपल्या राष्ट्राची फार मोठी सेवा केली आहे. सांस्कृतिक ऐक्य ही आपल्या राष्ट्राची फार मोठी शक्ति आहे व ती निर्माण करणे हे आजचे सर्वांत मोठे व महत्वाचे कार्य आहे. तें कार्य केल्याबद्दल सय्यद अमीन यांना

धन्यवाद."


-खान अब्दुल मजीद, एम्.ए.