पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)


 " भाषेच्या व वाङ्मयाच्या दृष्टीनीं हैं पुस्तक मराठी भाषेत बऱ्याच श्रेष्ठ दर्जाचें ठरतें. "

- प्रमोद, मुंबई


 " लेखकाची मराठी भाषा नसतांनाही पुस्तकाची भाषा इतकी सुंदर उतरली आहे की मराठी मातृभाषा असणाऱ्यांपैकींसुद्धां अनेक लेखकांनी तिचा कित्ता गिरवावा. "

- प्रतिभा, मुंबई


 "हल्लीच्या अस्थिर परिस्थितीत असें पुस्तक प्रसिद्ध करून सय्यद अमीन यांनी खरोखरीच एक महत्त्वाची कामगिरी बजाविली आहे."

- सकाळ, पुणे


 “ सय्यद अमीन यांची मातृभाषा उर्दू असून शुद्ध व सुंदर मराठीत त्यांनीं हैं चरित्र लिहिलें आहे हे अत्यंत भूषणावह आहे."

— महाराष्ट्र साहित्य पत्रिका,' पुर्णे


 "पुस्तक अतिशय उपयुक्त झालें आहे."

— महाराष्ट्र, नागपूर


 " मि. अमीन यांनीं हैं पुस्तक लिहून मराठी वाङ्मयाच्या चरित्र विभागांत एका उत्तम पुस्तकाची भर घातली आहे.

- निजाम विजय, हैद्राबाद