पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
इस्लाम आणि संस्कृति



भंग करूं नये, एकादा मुस्लिम या जाहीरनाम्याविरुद्ध वागला तर तो परमेश्वराचा व आमचा गुन्हेगार होईल.

 वरील कलमें वाचल्यानंतर इस्लामने राज्यशास्त्रांत सहिष्णुतेस केवढें उच्च स्थान दिले आहे आणि परधर्मियांच्या स्वातंत्र्याविषयी केवढी जागरूकता प्रदर्शित केली आहे हे स्पष्टपणे दिसून येईल.

 इस्लामनें राजकारणात न्यायास अग्रपूजेचा मान दिला आहे.न्यायाने वागणे म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचे परिपालन करणे होय असें इस्लाम मानतो. निस्पृह न्यायदान हे लोकशाहीचे वैभव आहे अशी इस्लामाची शिकवण आहे. न्यायाचे स्थान सदैव उच्च आहे असे समजण्यांत येते. राष्ट्रांतील अधिसत्तेच्या लहरीनुसार न्याय दिला जात नाही, उलट त्या अधिसत्तेला मार्गदर्शन करण्याचे श्रेष्ठ कार्य न्यायाकडून होत असते. इस्लामने अधिसत्ता अन्यायाच्या, असत्याच्या मागनि जाऊ लागली तर तिला योग्य मार्गावर आणण्याचा अधिकार न्यायाला दिला आहे. ज्यांच्या हातांत सत्ता आहे त्याना न्यायदानांत मुळीच ढवळाढवळ करता येत नाही किंबहुना अशा सत्ताधिकाऱ्याना न्यायदेवता जाब विचारूं शकते. ज्या ठिकाणा राज्यकर्त्यांच्या मर्जीवर न्याय अवलंबून असतो, ते सांगतील त्याप्रमाणे न्याय दिला जातो त्या ठिकाणी किंवा त्या राष्ट्रात कधीही स्वास्थ्य नांदणे शक्य नाही. न्यायाच्या स्वातंत्र्यावर, स्थैयोवर व इभ्रतीवर राष्ट जगत असते व प्रगत पावत असते. जातपात, धम, गरीब-श्रीमंत, सत्ता किंवा गणगोत यांचा विचार न करता ज्या राष्टांत न्याय दिला जातो तें राष्ट, ती राजवट किंवा ती लोकशाहा सदैव उत्कर्ष पावत असते; याच्या उलट परिस्थिति असल्यास ती राष्ट्रात