Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अनुवादकाचे चार शब्द


  भाई मानवेंद्रनाथ रॉय यांच्या Historical Role of Islam या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचकांस सादर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचें यंत्र स्वतः कुशलतेनें चालविणाया हिंदुस्थानांतील पुढायांपैकीं रॉय हे एकटेच होत. या दुष्टीनें रॉय यांची योग्यता हिंदी राजकारणांत अद्वितीय आहे. या त्यांच्या व्यापक कार्यापेक्षाही त्यांनी हिंदी तत्त्वज्ञानांत सुसंगति लावून दाखवून जें कार्य केले आहे ते अधिक चिरस्थायी आहे. त्याचप्रमाणें हिंदुस्थानांतील राजकारणांत आवश्यक अशी विचारक्रांति घडविण्याचे कार्य त्यांनी जे केलें तेंही महत्त्वाचें आहे. सध्यां ' इंडिपेंडंट इंडिया' हें साप्ताहिक व त्यांची इतर पुस्तकें यांच्या द्वारा ते आपलें तत्त्वज्ञान प्रकट करीत आहेत. त्यांत त्यांची गाढ विद्वत्ता, शास्त्रांचा खोल अभ्यास व बुद्धिवादाची परिसीमा दिसून येते.
 त्यांचे सर्व राजकीय विचार सर्वांना मान्य होण्यासारखे आहेत असें नाहीं. किंबहुना सध्या तर त्या बाबतींत पुष्कळच मतभेद होण्या-सारखा आहे. परंतु त्यांचे विचार त्यांच्या प्रतिस्पध्र्यांनाही विचारणीय वाटावेत असेच आहेत. विशेषतः तत्त्वबोधात्मक असे त्यांचे प्रबंध अत्यंत मननीय असे आहेत.अशा विचारप्रवाहांचे वारे महाराष्ट्र वाङमयाच्या वाटिकेंत वाहू लागलें तर तेथील लतावृक्षादिकांना अभिनव चैतन्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीं;आणि सध्या तर अशा नवजीवनाची आवश्यकता अधिकच आहे.

 विशेषतः Historical Role of Islam या पुस्तकांत इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य अत्यंत तर्कशुद्ध रीतीने मांडलें असल्यामुळे या