पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य

 विषयाकडे पाहण्याची एक नवीन दुष्टीच आपणांस मिळाली असें मला वाटलें;व सध्यांच्या हिंदुमुसलमानांच्या तेढीच्या वेळी सुशिक्षित जनतेला या दुष्टीचा लाभ होईल तर फार बरें असे वाटलें; म्हणून हौसेनेंच अनुवाद करावयाचा ठरविलें.अनुवाद झाला; पण त्याच्या प्रकाशनाची सोय ? " प्रकाश मंडळाचे"चे चालक माझे स्नेही रा. दयार्णव कोपर्डेकर यांनीं तो अनुवाद प्रकाशांत आणावयाचें ठरविलें व त्यांच्याच चिकाटीमुळे तो प्रकाशित होऊ शकला. या पुस्तकाचें हस्तलिखित लिहिण्याचें काम माझे स्नेही रा. ए.व्ही. जोशी यांनीं करून दिलें, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहें.
 हें पुस्तक प्रकाशित करण्यास ती. पां. के. शिराळकर, एम्. एल्.ए. यांनीं उत्तेजन व साहाय्य दिलें, ह्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतों.
 त्याचप्रमाणे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीं वेळांत वेळ काढून प्रस्तावना लिहून दिली बद्दलही त्यांचे आभार मानणें मी माझें कर्तव्य समजतों.
 मुद्रणाच्या बाबतींत रा. दाते यांनी जी कुशल तत्परता दाखविली तीबद्दल तर मला सानंद अचंबा वाटत आहे.

१९६।७४ सदाशिव पेठ,
पुणे, ता. १५-७-३८

श्रीनिवास व्यं. नखाते