Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राणी आहे, ही गोष्ट नाकरतां येणार नाहीं. मनुष्य आणखीहि कांहीं अधिक असतो. परंतु परिस्थितीचाहि तो असतो. शंभरांपैकी नव्वद लोक परिस्थिति- शरण असतात. एखाद्या विशिष्ट देशांतील संस्था कोणत्याहि असोत. त्या त्या संस्था त्या त्या देशांतील विशिष्ट परिस्थितीमुळेच संभवल्या असे दिसून येईल. मुहंमदांनीं जो धर्म दिला, जे नियम दिले, जी नीति दिली, ज्या संस्था दिल्या त्यांचें स्वरूप नीट समजण्यासाठी अरबस्थानची परिस्थिति पाहिली पाहिजे. अरबस्थानांतील परिस्थितीच्या प्रभावळीत मुंहंमदांस पाहूं या, म्हणजे त्यांचें कार्य नीट कळेल. कोणत्या मर्यादांत, कोणत्या लोकांत, कोणत्या प्रदेशांत, कोणत्या परिस्थितींत त्यांना काम करायचें होतें तें पाहूं या.

■ ■ ■


तें पहा अरबस्थान. ईजिप्त व असीरिया यांच्यामधला हा प्रदेश. एक चमत्कृतिमय प्रदेश. कोणालाहि शरण न जाणारा व कोणासहि फारसा माहीत नसलेला प्रदेश, सीझर व खुश्रू यांच्या फौजा जात-येत, तेव्हांच थोडासा परिचय या देशाचा होई. इराण, ईजिप्त, रोम, बायझंटाईन सर्वांनी हा प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले. परंतु प्रयत्न अपेशी ठरले. आणि अलेक्झांडरहि आपली स्वप्ने मूर्त करण्यासाठी जगता तर त्यालाहि या देशांत जीवनांतील
४ ।