या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाकिली. पुन्हां एकदां सर्वांस सांगितले, "वेळच्या वेळेस प्रार्थना करीत जा. धार्मिक व्रत पाळा. बंधुभावानें वागा. शांतीनें रहा. सदिच्छा बाळगा. नंतर कुराणांतील (२८:८३) पुढील आयत त्यांनी म्हटली-
"जे नम्र आहेत, जे अन्याय्य गोष्ट करीत नाहींत त्यांना परलोकीं प्रासाद मिळतील. जे पवित्र व धर्मशील आहेत त्यांना परिणामी सुख आहे." हा चरण म्हणून ते घरीं आले. तें शेवटचे प्रवचन, ती शेवटची सामुदायिक प्रार्थना.
परमेश्वराजवळ जाण्याची घटका जवळ येत चालली. इ. स. ६३२. जूनची ८ वी तारीख होती. देह गळू लागला. सोमवार होता. पैगंबर स्वतःशीच प्रार्थना म्हणत होते. प्रार्थना मनांत म्हणत म्हणत प्राण गेले! थोर पैगंबरांच्या पवित्र आत्महंसाने परमेश्वराच्या पायांशीं कृतार्थ होण्यासाठी उड्डाण केलें. दुपारची ११ वाजण्याची ती वेळ होती.
回 回 回
१४४ ।