Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "प्रभो, मी माझा संदेश दिला. मी माझें कार्य पुरें केलें आहे."
 आणि सभा गर्जती झाली, "खरोखरच तुम्ही आपले कार्य पुरें केलें आहे." पैगंबर पुन्हां अखेर म्हणाले, "प्रभो, माझ्या कामाला तुझीच साक्ष दुसरें मी काय सांगू? हीच माझी प्रार्थना."
 ख्रिस्ताचें पर्वतावरील प्रवचन अधिक काव्यमय वाटते. मुहंमदांचें हे पर्वतोपनिषद् साधे आहे. त्यांत गूढ गहन कांहीं नाहीं. साध्या गोष्टी. परंतु रोजच्या जीवनांतील. घरीदारी कसें वागावें, संसारच सुंदर व सारमय कसा करावा, तें त्यांनी सांगितलें. सर्वसामान्य लोकांस नैतिक मार्गदर्शनार्थ स्पष्ट व सुबोध दिशा हवी असते. ती स्पष्ट दिशा या प्रवचनांत होती.

回 回 回





प्रवचनानंतर यात्रेचे सर्व विधि करून पैंगंबर पुन्हां मदिनेस जाण्यासाठीं निघाले. मदिनेनें त्यांना आधार दिला होता. तेथेंच ते देह ठेवूं इच्छित होते. शेवटचे वर्ष होतें. प्रांतांची व्यवस्था लावण्यांत येत होती. मुस्लिम फेडरेशनमध्ये नवधर्म स्वीकारून ज्या जातिजमाती सामील झाल्या होत्या त्या सर्वांची नीट सुसंघटित व्यवस्था लावण्यांत आली. सीरिया व मेसापोटेमियामधील अरब लोकांत
१४० ।