Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करवीत होता, मुहंमद निमित्तमात्र होते, असें मुसलमानांनी म्हटले तर त्यांत काय आश्चर्य? ज्याला काल परवांपर्यंत फत्तर फेंकून मारीत होते, ज्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेंच नऊदहा वर्षांच्या अवधीत आपल्या लोकांना नैतिक अधःपाताच्या दरींतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम, सहस्रप्रणाम, त्या महापुरुषाला.

回 回 回





मुहंमदांचें जीवन म्हणजे उदात्ततेचा आदर्श आहे. उदात्त कर्मानीं खच्चून भरलेलें असें हे पुण्यश्लोक जीवन आहे. सुप्त लोकांत त्यांनीं चैतन्याची कळा संचरविली. परस्पर भांडणाऱ्यांस त्यांनी एक केलें. अमर जीवनाच्या आशेनें कर्तव्यकर्म करण्याची त्यांनी प्रेरणा दिली. मानवी हृदयावर इतस्ततः पडलेलें किरण केंद्रीभूत व पुंजीभूत करून त्यांनी प्रचंड प्रकाशाचा झोत निर्माण केला. आणि त्यांचा उत्साह कसा, आशा कशी अदम्य व अमर! थांबणें नाहीं. तडजोडीस वाव नाहीं. अप्रतिहत धैर्यानें हा महापुरुष सारे अडथळे झुगारून पुढेच जात राहिला. त्यांनी परिणामांची दरकार कधींच बाळगिली नाहीं. ईश्वरावर श्रद्धा ठेवून जात होते. एकाच ध्येयाचा त्यांना सदा निदिध्यास. स्वतःचा
१३६ ।