ते क्षमा करते झाले. सर्व मक्कावाल्यांस सार्वजनिक माफी जाहीर करण्यांत आली. फक्त चार जणांस शिक्षा देण्यांत आली. सारे सैन्य शांतपणे शहरांत शिरलें. लुटालूट नाहीं. कांहीं नाहीं. स्त्रीचा कोठें अपमान नाहीं. जगाच्या इतिहासांत असा विजयप्रवेश क्वचितच सांपडेल!
मक्कावाल्यांस त्रास दिला गेला नाहीं. परंतु त्यांच्या त्या मूर्तीनां त्रास झाला. जुने मूर्तिपूजक आपल्या मूर्तीचा भंग शांतपणे पहात होते. त्या सर्व मूर्ति मुहंमदांनीं स्वतःच्या हातांनी फोडून टाकल्या! प्रत्येक मूर्तीसमोर मुंहमद उभे रहात व म्हणत "सत्य आले आहे. असत्य नष्ट होत आहे." असें म्हणत व मूर्ति फोडीत. अशा रीतीनें सर्व मूर्ति भंगून सारे जुने धर्मकांड रद्द करून जमलेल्या सर्वांना उद्देशून त्यांनी भाषण केलें. कुराणांतील ममानवांच्या ऐक्याचे मंत्र त्यांनी प्रथ म्हटले. नंतर भाषण झाले. भाषणानंतर कुरेशांना त्यांनी विचारिलें.
"मी तुमच्याशी कसें वागावें असें तुम्हांस वाटतें?"
"दयेनें व प्रेमानें. सहानुभूतीनें व अनुकंपेनें." ते म्हणाले. आणि मुहंमदांस "हे प्रेमळ व दयाळु भावा, हे प्रेमळ व मायाळू पुतण्या" अशा त्यांनीं हांका मारल्या. मुहंमदांस गहिंवर आला. ज्यांनी द्वेषमत्सराची आग पाखडली तेच आज मुहंमदांस प्रेमाने संबोधित होते. पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रु आले व ते म्हणाले, "जोसेफ आपल्या भावांस म्हणाला तसेंच मीहि म्हणतो. तुम्हांला मी नांवें ठेवित नाहीं. ईश्वर तुम्हांला क्षमा करील. तो अत्यंत दयालु आहे. कृपासागर आहे. रहिमवाला मेहेरबान आहे." (कुराण सुरा १२:३१).
या क्षमेचा व दयेचा परिणाम अपरंपार झाला. भराभरा लोक येऊ लागले. नवधर्म घेते झाले. सफा टेकडीवर मुहंमद बसत. जे येत त्यांच्याजवळून मागें मदिनावाल्यांजवळून आरंभी जशी शपथ घेतली होती तशी घेत.
"ईश्वर एक आहे, अद्वितीय आहे. त्याच्याशीं दुसरेंतिसरें मी मिसळणार नाहीं. व्यभिचार करणार नाहीं. बालहत्त्या करणार नाहीं. असत्य बोलणार नाहीं. स्त्रियांविषयीं अनुदार व असभ्य बोलणार नाहीं."
पैगंबरांचं अंतःकरण उचंबळून येत होते. जीवनकार्य सफळ होत होतं. कुराणांत म्हटले आहे, "ईश्वराची मदत मिळेल. जय होईल. प्रभूच्या धर्मांत हजारों येऊ लागतील. त्या वेळेस ईश्वराची स्तुति कर. त्याची क्षमा माग. जे
१२२ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१३८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे