स्त्रिया व मुलें गुलाम केल्यावर त्यांची वांटणी झाली! कोणी इतिहासकार म्हणतात, "रैहान नावांची ज्यू स्त्री मुहंमदांसाठी ठेवली गेली होती!" परंतु या गोष्टीस पुरावा मिळत नाहीं. मुहंमदांच्या इतर सर्व स्त्रियांची हकीकत मिळते. परंतु ती मुहंमदांची स्त्री होती असा कोठेंहि उल्लेख येत नाहीं. तेव्हां ही एक कल्पित कथा असावी.
回 回 回
ज्यूंचा निकाल लागला. परंतु आसपासचे बेदुइन आतां सतावूं लागले. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरू झालें. या सुमारासच सिनाई पर्वतावरील सेंट कॅथेराइन मठाला व सर्वच ख्रिश्चन लोकांना मुहंमदांनी जी सनद दिली ती सुप्रसिद्ध आहे. जगाच्या इतिहासांतील ती अपूर्व सहिष्णुता होती. विशेषतः सेमिटिक धर्मामध्ये तरी ही वस्तु निःसंशय अपूर्व होती. ख्रिश्चनांना त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या राजांकडूनहि ज्या सवलती मिळाल्या नाहींत त्या मुहंमदांनी दिल्या. आणि "जो कोणी मुस्लिम मी दिलेल्या या आज्ञापत्राविरुद्ध वागेल तो धर्मच्युत समजला जावा. ईश्वरी आज्ञेचा भंग करणारा मानला जावा" असेंहि त्यांनीं जाहीर केलें. "ख्रिश्चनांचा सांभाळ करणें, त्यांच्या मंदिरांचें, चर्चेस् चे