मिळावी, ज्यूंना परकें वाहूं नये म्हणून मुहंमद किती जपत होते ! मोझेस, ख्रिस्त वगैरे पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांविषयीं मुहंमदांस अत्यन्त आदर वाटत असे म्हणून जेरुसलेमकडे तोंड करण्यांत त्यांना अवघड वाटलें नाहीं. त्यांनीहि एकेश्वरी धर्मच, निर्गुण निराकार परमेश्वराचाच धर्म दिला होता. ज्यूंनाहि तिकडे तोंड केलें म्हणजे समाधान वाटेल व पैगंबरांविषयी आपलेपणा वाटेल असे सर्वांस वाटत होतें. परंतु मुहंमदांनी कितीहि आपलेपणा व औदार्य दाखविलें तरी ज्यू प्रसन्न झाले नाहींत. अरबस्थानाचे ज्यूस्थान करण्याचें का त्यांच्या मनांत होते? मुहंमदाला आपल्या हातचें एक साधन बनवावें असें का त्यांना वाटत होतें? परंतु मुहंमद तर सत्ताधीश झाले. ज्यू जळफळूं लागले. आणि शेवटीं या नवधर्माच्या शत्रूंना ते मिळाले! मुहंमदांचा धर्म साधा होता. ज्यूंच्या धर्मातून जेवढे घेणें शक्य तेवढे त्यांनी घेतलें होतें. आणखी घेणें म्हणजे व्यापक धर्माला कमीपणा आला असता.
ज्यूंचा विरोध वाढू लागला. ते सतावू लागले. कुराणांतील शब्दांचा, वाक्यांचा मुद्दाम वेडावांकडा चुकीचा उच्चार करीत व त्यामुळे सुंदर अर्थ विकृत होई. ज्यू मुहंमदांस मुद्दाम कठीण प्रश्न विचारीत. कुराणांतील ज्यूसंबंधींचा मजकूर चुकीचा आहे म्हणत. मुहंमद म्हणत, "मी नाहीं चुकलो. तुम्हीच तुमच्या पुस्तकांत बदल केला असेल. तुम्ही त्यांतला मजकूर दडपून टाकला असेल." नवधर्माचा उपहास करण्यासाठी ते स्वतःच्या धर्मासंबंधींहि खोटें बोलू लागले. ते मूर्तिपूजाच खरा धर्म आहे असें म्हणूं लागले. इस्लामची नालस्ती करूं लागले. कोणी जर "तुम्हांला इस्लाम आवडतो की, मूर्तिपूजा" असा प्रश्न केला तर खुशाल "मूर्तिपूजा" असे उत्तर देत. त्यांनी ज्यू कवि कवयित्र्या यांचेहि रान उठविलें. काव्यांतील इस्लामच्या नालस्तीला सीमाच राहिली नाहीं ! मुस्लिम स्त्रियांसंबंधींहि वाटेल तें अभद्र त्यांतून असे. पैगंबरांची, मुस्लिम भगिनींची नालस्ती व बेअब्रू करूनच ते राहिले नाहींत तर मदिनेच्या शासन- संस्थेशींहि त्यांनी द्रोह मांडला. मक्केच्या कुरेशांना मदिनेतील मुसलमानांचे बळ किती आहे वगैरे माहिती त्यांनी पुरविली. ज्यू व असंतुष्ट अब्दुल्ला-उबय याचा मुनाफिकीन पक्ष हे कुरेशांशी कारस्थानें करूं लागले. "मुहंमदांशी आम्ही केलेला करार वरपांगी आहे. तुम्ही मदिनेच्या दरवाजांत येतांच आम्ही तुम्हां मूर्तिपूजकांस मिळू!" असेंहि त्यांनी कळविलें. मदिनंत या राजद्रोह्यांचा, दगलबाजांचा
१०० ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/११५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे