Jump to content

पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाय. तिथे डोंगराला करदोडा घालावा तशी खोल नाली खणलीया. आन् कडेला झाडं लावलीया. · नालीत पाणी तुंबतं. झाडं उनात बी हिरवीगार दिसत्यात. दरड रचून उताराच्या घळी आडिवल्यात. नि डोंगरात लई झाडं लावलीत. लिंबारा.. चिंच.. बिबा.. कडुनिंब.. कितीतरी! गावात हरेक घरासमुर पपई, चिमकुरा, शेवगा नि तुळस दिसनारच. मोरीचं पानी झाडांमधून खेळवलंया. गेल्या चार सालात हिरीचं पानी बी वाडलंया असं समदे बोलतात खरं!!"

 "मग ठरलं तर. यंदा वरची बुजलेली विहीर गाळ काढून मोकळी करू. ती भरेतो टँकरने पाणी पाठवतो. पण तुम्ही झाडं लावायची तयारी करायची. यंदाचा पाऊसकाळ वाया जाऊ देऊ नका. कबूल?"

१३