पान:इतिहास-विहार.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
केळकरांचे लेख

 पण इतिहासाच्या पर्वतशिखरावर ताजी हवा घेत सदैव राहतां येत नाही व राहून चालत नाहीं हेंहि लक्षांत ठेवले पाहिजे. बाराहि महिने पर्यंत शिखरावर घालवितां आलं व खालच्या व्यवहाराच्या जाचांतून मुक्त होतां आले तर ते कोणासहि हवेंच आहे, पण तें होणार कसे ? इतिहास स्वादा- संबंध दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे ती ही की, इतिहास हा मनुष्याच्या हाती एखाद्या सोन्याच्या गटाप्रमाणें संकलित ज्ञान देतो; पण तें सोनें कोठें कसें किती किंमतीस मोडावें व खावें यांचे तारतम्यज्ञान स्वतः मनुष्यास असावें लागतें. कित्येक वेळा इतिहास हा मार्कडेननें एका विनोदी गोष्टींत सांगितल्याप्रमाणे, १०००० पौंडांइतकी मौल्यवान् चलनी नोट आप- ल्या. स्वाधीन करतो, पण अट अशी घालतो की, ती मोडूं तर नये, पण ती दाखवून बाजार तर करून यावा. परिस्थितीमुळे अव्यवहार्य असणारे असे इतिहासाचे जे अनुभव ते या चलनी नोटीसारखे असतात. त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करतां येत नाहीं म्हणून त्यांच्या पतीवर जो व्यवहार सिद्धीस नेतो त्यानेंच खरोखर शहाणपणानें इतिहास वाचला. इतिहास वाचल्याने किंवा ऐतिहासिक स्थळें पाहूं गेल्यानें भुतं अंगांत संचारणें हैं स्वाभाविक असेल, पण याहि बाबतीत दोन गोष्टी लक्षांत ठेवल्या पाहिजेत. भुतांतहि सुष्ट व दुष्ट असे दोन प्रकार असतात, म्हणून दुष्ट भुतांनी आपल्या भंगांत संचरू नये अशाविषयीं खबरदारी घेतली पाहिजे. पहिल्या बाजीरावाचे भूत अंगांत शिरावें म्हणून शनिवारवाड्यांत गेलें आणि तेथें आनंदीबाईचेंच भूत अंगांत शिरले तर काय उपयोग ? दुसरी गोष्ट अशी की, भूतेंसुद्धां चाणाक्ष असतात. ती देखील परकायाप्रवेशाच्या कामी पात्रापात्रतेचा विचार चांगलाच करतात.. रायगडावर आजवर हजारों माणसें गेली असतील व पुढेंहिं जातील, पण 'शिवाजीच्या भुताला फार तर कोणत्या तरी एकाच शरीरांत प्रवेश करतां येणार व सत्पात्र मिळेपर्यंत तो प्रवेश होणारहि नाहीं. शिवाजीचें मृत कुंडी पाहील ती आपल्या गुणासारखे गुण ज्या कुडत आढळतील तीच पाहील व तींतच प्रवेश करील. शिवाजी हा जातीनें धाडशी होता. कंदाचित् ज्यांत प्राणहि जातील अशा प्रसंगी तो स्वतः जातीने हजर असे. अशा प्रसंगीं तो केवळ आपल्या अनुयायांवर काम सोपवीत नसे. शिवाजी हा स्वार्थत्यागी, अत्यंत उद्योगी, व परिस्थितीचा विषाद मानून बाजूस