संस्थानचा कारभार सर्व त्यांच्या शिरावर होता. ही दगदग दिवसेंदिवस त्यांस उरकेनाशी झाली व त्यांतच हा पुत्रशोक प्राप्त झाला होता! तथापि धैर्य धरून आपला नातू व्यंकटराव याच्या कल्याणासाठी त्यांनी पूर्वीप्रमाणें काम कारभार पुढें चालविला. त्यांची कन्या वेणूबाई ही त्रिंबकराव मामा पेठे यांची बायको. ती आईचें सांत्वन करण्याकरितां कित्येक महिने इचलकरंजीस येऊन राहिली व व्यंकटरावांस बरोबर घेऊन पुण्यास परत गेली. प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळें पेशवे मे महिन्यापासून गोदावरीतीरीं कटोरें येथें राहिले होते ते तेथेंच अजूनही होते.
लाट रांगोळी हे दोन गांव राणोजी घोरपडयांकडून थोरले
व्यंकटराव नारायण यांस इनाम मिळाले होते हें मागे सांगितले आहे.
सन १७६४ त चिकोडी व मनोळी हे तालुके पेशव्यांनी कोल्हापुरकरांस
+ या दोन तालुक्यांचा संक्षेपानें इतिहास सांगण्यापुरतासुद्धां येथें अवकाश नाहीं, तथापि या तालुक्यांची हकीकत डफ्साहेबांनी (पृ० ४००) दिली आहे. तींतल्या चुका मात्र येथें दाखवितो. हे तालुके पूर्वीपासून करवीरकरमहाराजांचे असून त्यांच्या तर्फे शेषो नारायण रुईकर हा मामलत वहिवाटीत असतां पुंडपाळेगार व काटक वगैरे लोकांनी बंडावा करून या तालुक्यांतली पुष्कळ ठाणीं व गांवें बळकाविली. तीं सोडवून घेण्याचें जिजाबाईस सामर्थ्य नव्हतें. सन १७६४ त माधवराव पेशवे हैदरअल्लीवर स्वारी करण्यास निघाले तेव्हां त्यांजवळ फौजेचा खर्च चालविण्यास पैका नव्हता. त्यावेळीं जिजाबाईनी पेशव्यांस पांच लक्ष रुपये दिले. व पेशव्यानीं या दोन्ही तालुक्यांतली बंडे मोडून जिजाबाईचा अंमल बसवून दिला. पेशव्यांस रकम देण्याकरितां व इतर खर्चाकरितां बाईनीं पुण्यातल्या सावकारांकडून कर्ज काढून त्याला हे तालुके तारण लिहून दिले व पेशव्यांची हमी दिली. पुढें करवीर दरबाराकडून कर्जाची फेड होईना, सबब सावकारांनी पेशव्यांस तगादा केला. मग पेशव्यांनी हे सक्तीनें तालुके करवीरकरांकडून कर्जाच्या फेडीकरितां सावकारांचे ताब्यांत सन १७७० सालीं देवविले. याप्रमाणें गोष्टी घडल्या असतां "माधवराव पेशव्यानी