पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१०५)
नारायणराव व्यंकटेश.

सरदेशमुखीचें वतन जप्त केलें होतें तें सोडण्याबद्दल व तिकडे इचलकरंजीकर यांची गांवें, खेडी, शेते, कुरणें, बाग, मळे वगैरे आहेत त्यांस उपसर्ग न देण्याविषयीं श्रीमंतांनी सन १७६७ च्या मे व जून महिन्यांमध्यें जिजाबाईसाहेबांस विनंतिपत्रें लिहिलीं. म्हापण गांवास वाडीकर सावंत यांजकडून उपद्रव होत होता तो बंद करण्याविषयीं पेशव्यांनी त्याच साली सावंतांस एक ताकीदपत्र पाठविलें होतें. आपल्या दौलतीचा याप्रमाणें बंदोबस्त करून घेऊन अनूबाई, तात्या व दादा परत इचलकरंजीस आलीं.
 अलीकडे माधवराव पेशवे व दादासाहेब यांमध्यें काही वितुष्ट आलें होतें त्याचे समक्ष गांठी पडून निराकरण व्हावें असा दोघांनींही संकेत ठरविला व त्याप्रमाणें सन १७६८ त आनंदवल्ली येथे उभयतांच्या गांठी पडल्या. पुण्याहून पेशवे फौज जमा करून तिकडे गेले तेव्हां नारायणरावतात्यांचे चिरंजीव व्यंकटराव दादा हे त्यांजबरोबर होते. ती त्यांची पहिली स्वारी. या वेळीं त्यांचे वय तेरा चौदा वर्षांचे होतें! उभय श्रीमंतांच्या भेटी होऊन दादासाहेब यांनी खर्चापुरता निराळा सरंजाम तोडून घेऊन स्नानसंध्या करून स्वस्थ रहावें असें ठरलें. दादासाहेब आनंदवल्लीसच राहिले व पेशवे पुण्यास आले. पण दोन तीन महिने लोटले नाहींत तोंच दादासाहेबांची चित्तवृत्ति बिथरली व ते राज्याची अर्धी वाटणी मांगू लागले! त्या गोष्टीस पेशवे अर्थातच कबूल झाले नाहीत. मग दादासाहेबांनीं लढाईच्या इराद्यानें फौज जमा केली. नंतर पेशव्यांनीं त्यांजवर स्वारी करून धोडप येथें त्यांचा पराजय करून त्यांस धरून आणिलें व पुण्यांत कैदेत ठेविलें. या स्वारींतही व्यंकटराव दादा आपल्या पथकासह हजर होते. नारायणरावतात्या ख्यालीखुशालींत व दुर्व्यसनांत मग्न होऊन इचलकरंजीत आयुष्याचे दिवस घालवीत होते. त्यानीं पुण्यास यावे व