पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्या व्यवसायात आपण भिन्नलिंगी पुरुष आहोत हे दाखवण्यावर खूप पैसा असतो, अशा ठिकाणी आपण समलिंगी आहोत हे उघडपणे सांगणं आर्थिकदृष्टया परवडणारं नसतं. उदा. सिनेमा नट. इथे हिरो 'ही मॅन' आहे हे सदैव प्रेक्षकांपुढे मिरवावं लागतं. जर घरचा मोठा व्यवसाय असेल, किंवा घरची खूप श्रीमंती असलेल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती समलिंगी असेल तर त्याच्या/तिच्या मनात हा विचार येऊ शकतो की, जर आपण समलिंगी आहोत हे घरच्यांना कळलं व त्यांनी आपल्याला घराबाहेर काढलं, तर ? एवढ्या श्रीमंतीत वाढल्यावर आता नव्याने आपण आपल्या पायावर उभं राहू शकणार का? हे सगळं ऐश्वर्य लाथाडायची आपली तयारी आहे का ? का लग्न करून, मालमत्तेवर अधिकार दाखवून बाहेर आपले समलिंगी संबंध चालू ठेवायचे? अशा बहुतेकांना घरच्यांना सांगायची जोखीम घ्यायची तयारी नसते, याला फार थोडे अपवाद आहेत. मानवेंद्र गोहील हा बरोड्याजवळच्या राजपीपला घराण्याचा राजपुत्र. २००६ साली त्यानी एका वर्तमानपत्राला जाहीरपणे सांगितलं को तो समलिंगी आहे. त्याच्या घरच्यांनी जाहीर नोटीस दिली की, आतापासून त्याचा आणि राजपीपला घराण्याचा काहीही संबंध नाही. [62] त्यावर तो म्हणाला, “मी समलिंगी आहे. मला आता क्लोजेटमध्ये राहाणं शक्य नाही.” काही महिन्यांनंतर त्याच्या घरच्यांनी त्याला परत स्वीकारलं, व २००७ च्या उत्तरार्धात त्याला 'ऑप्रा विनफ्री' शोवर बोलावण्यात आलं. इंद्रधनु... ८७