पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरुष 'हो' म्हणतात व काही पुरुष, समलिंगी मुलींशी लग्न करून त्यांना 'सुधारण्याचा' विडा उचलायची तयारी दाखवतात. अशा पुरुषांनी स्वतःच्या पुरुषार्थाशिवाय इतर कुठल्याही भावनेला, हक्कांना महत्त्व दिलेलं दिसत नाही. समाज या विषयाकडे कसा बघतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांना विचारलं की, तुमच्या बहिणीचं लग्न एका समलिंगी पुरुषाशी लावाल का ? तर त्याला मात्र सगळयांचं उत्तर 'नाही' असतं.) बहुतेक पालकांची समलैंगिकतेकडे बघण्याची दृष्टी नकारात्मक असते. नातेवाईक, शेजार व इतरांना जर ही गोष्ट कळली तर, आयुष्यभर ते नावं ठेवतील ही भीती असते; 'अजून बहिणींचं लग्न व्हायचंय, इतरांना कळलं तर त्या अविवाहित राहतील' ही काळजी असते. या सगळ्यामुळे आई-वडिलांवर प्रचंड दबाव असतो. ते आपल्या मुलाची/मुलीची बाजू समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. आपल्या मुला/मुलीचं लग्न झाल्यावर त्याचे/तिचे काय हाल होतील, दुसऱ्याच्या मुला/मुलीची आपण जाणूनबुजून फसवणूक करत आहोत या गोष्टीकडे ते कानाडोळा करतात. "मी एकुलता एक मुलगा. तीन वर्षापूर्वी वडील वारले. माझ्या शिवाय आईला कुणाचाही आधार नाही. तिला मी सांगू शकत नाही. माझं लग्न झालं. त्यामुळे ----ला (माझ्या बॉयफ्रेन्डला) नैराश्य आलं. त्याने माझ्या घरी येऊन माझ्या आईला सांगितलं की, आमचं पाच वर्ष एकमेकांवर प्रेम होतं. आई तेव्हा काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी बायको कामावर गेल्यावर म्हणाली- 'जे झालं ते झालं. आता मागे वळून बघायचं नाही. हा विषय परत निघता कामा नये.' " 'सुखी' संसार- काही समलिंगी पुरुषांना स्त्रीबरोबर संभोग करता येतो. बायकोशी कर्तव्य म्हणून (आणि तिला संशय येऊ नये म्हणून) अधूनमधून तिच्याशी संभोग करतात. त्यांना मुलं होतात. बायकोला आपला नवरा समलिंगी आहे हे आयुष्यभर कळत नाही. समाजासाठी हे एक सुखी भिन्नलिंगी कुटुंब असतं. काही पुरूष लग्न झाल्यावर समलिंगी जोडीदार मिळाला तर त्याच्याबरोबर नातं प्रस्थापित करतात. कोणाला कळणार नाही असं. घरचं सगळं सांभाळून, घरच्यांना संशय येणार नाही या बेतानं दोन आयुष्यं जगतात. असं जगणं कठीण असतं. प्रत्येक वाक्य जपून बोलावं लागतं. प्रत्येक गोष्ट जपून करावी लागते. या गोष्टीचा सतत ताण असतो. या दुफळी जगण्यात खूप शक्ती खर्च होते. काही पुरुष आपल्या बायकोबरोबर संभोग करायचा टाळतात. अशी काही जोडपी आहेत, ज्यांच्यात पुरुषांनी लग्न झाल्यापासून बायकोबरोबर संभोग केलेला नाही, किंवा प्रयत्न केला तरी जमला नाही. असं झालं की, बायकोची हळूहळू चिडचिड व्हायला लागते. आपली फसवणूक झाली आहे हे तिला जाणवायला लागतं. कधीकधी इंद्रधनु ८२ 474