पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वयात येताना वयात आल्यावर समलिंगी मुला/मुलींना त्यांच्याच लिंगाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण वाटू लागतं. एक लेस्बियन म्हणाली, "मी नववीत होते तेव्हा आमच्या एक शिक्षिका मला खूप आवडायच्या. त्यांची एक दिवस जरी रजा असली तरी मला सहन व्हायचं नाही. त्यांना बघण्यासाठीच मी शाळेत जायची, असं म्हटलं तरी चालेल. त्यांना मनात आणून मी स्वत:ला शरीरसुख द्यायचे. एक-दोन मुलं माझ्यावर लाईन मारायची. मी त्यांच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.” उभयलिंगी मुलांना मात्र आपली लैंगिकता लगेच उमजत नाही. एकजण म्हणाला, “मी सुरुवातीला खूप गोंधळलो होतो. मला दोघांबद्दल (मुलं/मुली) आकर्षण वाटत होतं. या अर्धवट स्थितीत असल्याचा त्रास व्हायचा. आता मला जाणीव आहे की, मी उभयलिंगी आहे व बहुतांशी माझं आकर्षण पुरुषांकडेच आहे.' " आपला लैंगिक कल इतरांपेक्षा वेगळा आहे हे सहसा कोणी इतरांपाशी बोलत नाही. आपली लैंगिकता कळली तर इतर जण नावं ठेवतील, त्रास देतील ही भीती असते. जर तो मुलगा बायकी असेल तर त्याला अनेक जण त्रास देतात. हेटाळून बोलतात. शाळा/कॉलेजमध्ये रॅगिंग होण्याची शक्यता असते. अशा मुलांना शाळा, कॉलेज एक नरक बनतो. शाळा, कॉलेजमध्ये जायचं म्हणजे अंगावर काटा येतो. "मी समलिंगी आहे हे होस्टेलमध्ये कळलं. तेव्हापासून मला मुलं सारखा त्रास देऊ लागली. चेष्टा करायची, नावं ठेवायची. रॅगिंग करायची. मला जीणं नकोसं करून टाकलं. मी मेलो तर यांच्या कचाट्यातून सुटेन असं वाटायला लागलं.” मुलगा बायकी नसला तर त्याच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. अशी मुलं चार-चौघात सहजपणे एकरूप होतात. ती जोवर आपल्या लैंगिक कलाबद्दल बोलत नाहीत तोवर त्यांची लैंगिकता काय आहे हे कळणं शक्य नसतं. हीच बाब मुलींबद्दलची.. पुरुषी स्त्रिया लोकांच्या नजरेत येतात. असा जेंडरवर आधारित दृष्टिकोन असल्यामुळे समाजात गैरसमज आहे, की सगळी समलिंगी मुलं बायकी असतात व सगळया समलिंगी स्त्रिया पुरुषी असतात. ह्या वयात खूप असुरक्षितता असते. चार लोकात आपण सामावणं, त्यांनी आपला स्वीकार करणं फार महत्त्वाचं असतं. आपण स्वीकारलो गेलो आहोत का? हे संदेश शोधणं सदैव चालू असतं. आपलं वेगळेपणं लक्षात आलं की आपल्याला स्वीकारणारा एकही संदेश मिळत नाही. समलिंगी लोकांबद्दलचा व्देष, त्यांची केलेली थट्टा, बायकी मुलांची हेटाळणी एवढेच संदेश त्यां मुलापर्यंत पोहोचत असतात. इंद्रधनु ७४