पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिनेमे पुण्या-मुंबईत चालतात पण वितरकांची साथ मिळत नाही. आम्ही इतर किती शहरात स्वतः रीळं घेऊन ड्रायव्हरला पाठवायचं? दोन शहरात, चार शहरात? याच्या पलीकडे हे वितरण शक्य होत नाही. हा सिनेमा कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. पण तो पोहोचला नाही म्हणून खूप नैराश्य आलं. मी आणि पालेकर दोघंही प्रत्येक शहरात चित्रपट प्रदर्शनानंतर जाऊन प्रेक्षकांशी चर्चा करायला तयार होतो. तरी अशा विषयांना सामाजिक मान्यता मिळतच नाही.' " एवढं करूनही सनातनी लोकांनी विरोध करून चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडलं तर ही सगळी मेहनत वाया जाऊ शकते. 'फायर', 'गर्लफ्रेंड' सिनेमे जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा याची झलक दिसली. 'फायर' सिनेमा लागलेल्या थिएटर्सवर सनातनी लोकांनी मोर्चे काढले. या सिनेमांचं प्रक्षेपण बंद पाडलं. मुक्तार अब्बास नकवी (Federal Minister of State for I & B ) म्हणाले की, "अशी नाती दाखविणं आपल्या समाजासाठी हानीकारक आहे". प्रमोद नवलकर म्हणाले की, " हा सिनेमा दाखवणं चालू ठेवलं तर हिंसा परत उफाळू शकेल". बीजेपी म्हणालं की, “ “गर्लफ्रेंड'सारखे सिनेमे हे भारतीय संस्कृतीविरोधी आहेत". [59] उर्दू वर्तमानपत्रातून 'गर्लफ्रेंड' सिनेमाच्या विरोधात लिहून आलं- 'इन्किलाब' : 'इतर मतभेद असले तरी या बाबतीत या (शिवसेना, बीजेपी) लोकांशी आमचं एकमत आहे'. 'हिंदूस्तान' : 'समलैंगिकता हा पाश्चात्त्य देशातून आलेला शाप आहे.' [60] " समाज जर प्रगल्भ व सुसंस्कृत बनवायचा असेल तर प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे. ते विचार पटत नसले तरी संवाद बंद होता कामा नये. विचारस्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. समाजात दहशतीचं वातावरण असलं तर समाजमान्य नसलेली मतं मांडण्यास लोकं कचरतात. संवाद हळूहळू कमी होतो व शेवटी बंद पडतो. ज्या समाजात संवाद नाही त्या समाजाचा -हास होतो. इंद्रधनु ७२