पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्गाचे काही धोके संभवतात. आपण खोटं बोलून आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा पैलू लपवून मूल दत्तक घेत आहोत. त्यामुळं एक गोष्ट लपवण्यासाठी कदाचित आयुष्यभर खोटेपणा करावा लागेल. यामुळे काही जण ब्लॅकमेलला बळी पडू शकतात. याला पर्याय म्हणून काही जण ‘फॉस्टर' पालक बनतात. या ठिकाणी डॉ. राज राव (पुणे विद्यापीठ इंग्रजी शाखा) यांचा अनुभव मांडण्याजोगा आहे. ते म्हणाले- “मी एका मुलाचा 'फॉस्टर' पालक आहे. त्याच्या शिक्षणाची आणि सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतली आहे. हे मूल कायद्यातून दत्तक घेतलेलं नाही. आपल्याकडे खूप पैसे असले, खूप शिकलेलो असलो, आपला स्वभाव, वागणूक चांगली असली, तरी आपण मूल दत्तक घेऊ शकत नाही. भिन्नलिंगी लोकांपेक्षा आपण मुलांना चांगलं वाढवू. आपल्यासाठी मुलं जास्त मोलाची आहेत कारण आपल्याला समलिंगी नात्यातून मुलं होणार नाहीत याची आपल्याला जाणीव आहे. या सगळ्यांचा विचार समाजानं करायला पाहिजे पण तसं दुर्देवानं होत नाही.' " 'त्रिकोण'चे संस्थापक अशोक व अरविंद विवाहबद्ध होताना O O इंद्रधनु ... ५०